शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

कुपवाडला मातब्बरांची अस्तित्वासाठी लढाई : बहुरंगी लढती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:14 IST

कुपवाड : महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत कुपवाड शहर व उपनगरांची तोडफोड करण्यात आली आहे. येथे एक, दोन, आठ आणि एकोणीस असे प्रभाग पडले आहेत.

ठळक मुद्देनव्यांसाठी तारेवरची कसरत

महालिंग सलगर।कुपवाड : महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत कुपवाड शहर व उपनगरांची तोडफोड करण्यात आली आहे. येथे एक, दोन, आठ आणि एकोणीस असे प्रभाग पडले आहेत. त्यामुळे ठराविक पक्षाचे प्राबल्य असलेल्या या शहरात आता पक्षांची पकड ढिली झाली असून बहुरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.

शहरात आता आजी-माजी मातब्बर नगरसेवकांचे अस्तित्व पणाला लागणार असून नव्यांसाठी तर ही तारेवरची कसरत ठरणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ही रचना शहरातील काही नगरसेवकांना अडचणीची ठरली आहे, तर काहींना सोयीची झाली आहे. त्यानुसार काहींनी बैठका घेण्यास सुरूवात केली असून, राजकीय डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनता दल, आम आदमी पार्टी आणि सुधार समितीही रणांगणात उतरणार आहे.शहरातील माजी उपमहापौर प्रशांत पाटील, विद्यमान उपमहापौर विजय घाडगे, निर्मला जगदाळे यांचा एकत्र मिळून प्रभाग एक तयार झाला असून यामधून ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत, विजय घाडगे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश ढंग, प्रशांत पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, मोहन जाधव, किरण सूर्यवंशी, जमीर रंगरेज, रवींद्र सदामते, अरूण रूपनर, अरविंद सकट, सुलोचना धनपाल खोत, निर्मला जगदाळे, रईसा मुश्ताकअली रंगरेज, साजीद मुजावर, सचिन चोपडे, विश्वजित पाटील निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

धनपाल खोत, शेडजी मोहिते, सुरेखा कांबळे यांचे प्रभाग एकत्र होऊन प्रभाग दोन तयार करण्यात आला असून या प्रभागातूनही धनपाल खोत, नगरसेवक गजानन मगदूम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश ढंग, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, सविता शेडजी मोहिते, भाग्यश्री बाळासाहेब माने, वंदना सायमोते, सुरेखा कांबळे, वहिदा नायकवडी, प्रकाश व्हनकडे, तानाजी व्हनकडे इच्छुक आहेत.

राष्टÑवादीचे नगरसेवक विष्णू माने, धनपाल खोत, स्रेहा औंधकर यांचा एकत्र मिळून प्रभाग आठ तयार झाला असून या प्रभागातून विष्णू माने, भाजपचे विशाल मोरे, सदा पाटील, मोहनसिंग रजपूत, जनता दलाचे संजय पाटील, अश्विन पाटील, कल्पना कोळेकर, स्रेहा औंधकर, शिवसेनेचे अनिल माने यांच्यासह अनेकजण तयारीत आहेत.

नगरसेवक युवराज गायकवाड, प्रियांका बंडगर, संगीता खोत यांचा एकत्र मिळून तयार झालेल्या प्रभाग एकोणीसमधून युवराज गायकवाड, प्रियांका बंडगर, भाजपचे संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, महेश कर्णे, अनिता आलदर, वर्षा संभाजी सलगर इच्छुक आहेत. त्यामुळे कुपवाडमध्ये यंदा बहुरंगी लढती पाहायला मिळतील.नवखे : अस्वस्थ...शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत प्रभाग एक व दोनमधून चाचपणी करीत आहेत. विष्णू माने यांनीही आठमधून तयारी केली असून, दोनमधून भावाच्या पत्नीला तर शेडजी मोहिते यांनी एकमधून तयारी करून दोनमधून पत्नीस उमेदवारीसाठी तयारी केली आहे. त्यामुळे नव्याने इच्छुक असलेले उमेदवार अस्वस्थ आहेत.पती-पत्नी मैदानात!ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत व त्यांच्या पत्नी सुलोचना खोत नेहमीच रणांगणात असतात. त्याप्रमाणे यंदा शेडजी मोहिते यांनीही त्यांच्या पत्नीस प्रभाग दोनमधून उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. या पती-पत्नीच्या निवडणूक तयारीची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.कुपवाड पॅटर्नची चर्चामिरजेतील नगरसेवक ज्याप्रमाणे अंतर्गत समझोता करून निवडणूक लढवितात, त्याप्रमाणे कुपवाडमधील इच्छुकही मिरज पॅटर्न येथे राबविण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी गुरूवारी रात्री शहरातील लाडले मशायक दर्ग्यामध्ये बैठक पार पडली असून, बरेचजण एकमेकांच्या संपर्कात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगली