कवठेमहांकळ : स्टेट बॅँक आॅफ इंडियाचा अधिकारी असल्याचे भासवून तालुक्यातील करोली (टी) येथील राजेंद्र बोरीगिड्डे यांच्या खात्यावरील १ लाख ४० हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली आहे. या प्रकरणाची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बोरीगिड्डे यांनी फिर्याद दिली आहे. गुप्ता नावाच्या बोगस व्यक्तीने फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. शहरातील स्टेट बॅँकेच्या शाखेमध्ये राजेंद्र काशिनाथ बोरीगिड्डे, रा. करोली (टी) यांचे खाते आहे. बोरीगिड्डे यांच्याकडून दूरध्वनीवरून खात्रीसाठी एटीएमचा आणि पिनचा नंबर आवश्यक आहे आणि आपण एसबीआयमध्ये अधिकारी आहे. आपले नाव गुप्त आहे. असे सांगून बोरीगिड्डे यांच्याकडून एटीएम आणि पिन बंनर घेतला. त्यानंतर गुप्ता यांनी १० ते १९ आॅक्टोबर या कालावधीत बोरीगिड्डे यांच्या खात्यावरून १ लाख ४० हजार रुपयांची रक्कम आॅनलाईन आणि मोबाईलद्वारे काढून घेतली.बोरीगिड्डे यांनी खात्यावरील पैशाची रक्कम तपासली असता, त्यामधील १ लाख ४० हजार रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. गुप्ता यांनीच आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर बोरीगिड्डे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (वार्ताहर)
बॅँक अधिकारी भासवून दीड लाखाला गंडा
By admin | Updated: November 21, 2014 00:29 IST