शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधवा प्रथा झुगारणारी 'बलगवडे' ठरली सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, राज्यात चौथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:04 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे.

सांगली : बलगवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीने आज, शुक्रवारी (दि. २०) झालेल्या मासिक सभेत विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला. असा ठराव करणारी सांगली जिल्ह्यातील ही पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव आणि अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतींनी असा ठराव मंजूर केला आहे.सरपंच जयश्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांनी १७ मेरोजीचा विधवा प्रथेविरोधातील शासन निर्णय वाचून दाखविला. त्यानुसार चर्चेअंती मीनाताई पाटील यांनी ठराव मांडला. सारिका बुधावले यांनी अनुमोदन दिले. सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला.हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे. सांगली जिल्ह्यात बलगवडे ग्रामपंचायत ठराव करणारी पहिली ठरली आहे. त्यात म्हंटले आहे की, विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. महिलांच्या सहभागातून यासंदर्भात गावात जनजागृती करण्यात येईल.बलगवडेमध्ये याकामी अनिल पाटील, उपसरपंच श्रीकांत मोहिते, माजी उपसरपंच उध्दव शिंदे, सदस्य धनाजी शिंदे, महादेव माळी, सुवर्णा  शिंदे, सचिन पाटील, माजी सरपंच सूर्यकांत थोरात, अजित जाधव आदींनी पुढाकार घेतला. अंनिसतर्फे राहुल थोरात यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत