शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: बदाम बैलाची एक्झिट येडेमच्छिंद्रकरांना चटका लावून गेली!, घरापासून शेतापर्यंत करायचा एकट्याने प्रवास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:55 IST

रीतसर धार्मिक विधी

निवास पवारशिरटे : माणसालाही अचंबित करणारी शिस्त, कुटुंबातील सदस्यांपेक्षा जास्त कष्ट उपसण्याची वृत्ती अन् माणसांवर जिवापाड प्रेम करण्याचे व्रत घेऊन ३० वर्षे येडेमच्छिंद्रमध्ये वास्तव्य करणाऱ्या ‘बदाम’ बैलाची एक्झिट गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली.  घरापासून शेतापर्यंत व परत तसाच चार किलोमीटरचा प्रवास तो एकट्याने करायचा. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालण्याची शिस्त त्याने कधीही मोडली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलासा वाटणारा ‘बदाम’चा प्रवास तब्बल ३० वर्षांचा. शनिवारी त्याने अखरेचा निरोप घेतला.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील चिंचेच्या मळ्यात राहणारे सुरेश पाटील यांच्या घरीच लहानाच्या मोठ्या झालेल्या या बैलाने पाटील कुटुंबासह सर्वांनाच लळा लावला होता.

पाटील यांची शेतजमीन कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर गावालगत. पाटील शेतात जाताना बदामला मोकळे सोडायचे आणि ते सायकल किंवा मोटारसायकलवरून पुढे जायचे. चिंचेचा मळा, येडेमच्छिंद्र गाव, कऱ्हाड-तासगाव रस्ता पार करून ‘बदाम’ शेतात पोहोचायचा. तिथले काम झाले की पुन्हा सायंकाळी पाच वाजता त्याचा परतीचा प्रवास ठरलेला.प्रवासात बदामने कोणालाच त्रास दिला नाही. अनोळखी व्यक्ती बैल सुटलाय म्हणून ओरडत, पण त्याच्याबद्दल कळले की अनोळखी लोकही अवाक् व्हायचे. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे तो अपार कष्टही घेत होता. त्याच्या पायात लक्ष्मी आहे, अशी पाटील कुटुंबीयांची भावना होती. प्रतिकूल परिस्थितीतून पाटील कुटुंबीयांना जे काही चांगले दिवस अनुभवाला आले, त्यात बदामचे योगदान मोठे होते, अशीही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पाटील कुटुंबीयांसह गावही हळहळले. पाटील कुटुंबीयांनी रीतसर रक्षाविसर्जन करून त्यास श्रद्धांजली अर्पण केली.रीतसर धार्मिक विधीपाटील कुटुंबीयांनी बदामला सदस्यच मानले होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सोमवारी माती सावरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतरचे दशक्रिया व उत्तरकार्यविधी रीतसरच करणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली