संख : जाडरबोबलाद (ता. जत) येथे पंचायत समितीचे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी, जाडरबोबलाद केंद्राचे केंद्रप्रमुख बी. बी. बडीगेर यांंचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. जाडरबोबलाद केंद्राच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बडीगेर यांचा शिक्षक गोविंद कोरे, लखन होनमोरे, प्रशांत तेलगाव, सिद्धेश्वर कोरे, सिकंदर शेख यांंनी सत्कार केला. तसेच गजानन हायस्कूल व शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे यांच्याहस्ते सत्कार केला. मुख्याध्यापक सिकंदर शेख, श्रीकांत माळी, आर. जी. बिरादार, शारदा रुगी, महालिंग तेली यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विनायकराव शिंदे, फत्तुसो नदाफ, गजानन हायस्कूलचे मुख्याध्यापक नीलकंठ स्वामी, नामदेव भोसले, गांधी चौगुले, भीमराय बिरादार, सीदराय चिकलगी, डी. एच. शिंगे, बी. के. जोग, जकाणा कांबळे, रमेश धायगोंडे, सिदाणा बिरादार, रफिक नदाफ, विलास खुडे उपस्थित होते. सिकंदर शेख यांनी सूत्रसंचालन केले. आर. जी. बिरादार यांनी आभार मानले.