शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ३७९ दूध संकलन संस्थांवर अवसायक, शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध 

By अशोक डोंबाळे | Updated: October 20, 2023 17:16 IST

दूध संस्थांवरील कारवाई मागे घेण्याची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी

सांगली : जिल्ह्यातील ३७९ संस्था जिल्हा, तालुकास्तरीय आणि मल्टिस्टेट सहकारी दूध संघांना दूध पुरवठा करीत नाहीत. म्हणून या सर्व संस्था अवसायनात काढून त्यांच्यावर अवसायक नेमलेले आहेत. सहकार विभागाच्या या कारवाईचा स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत जाहीर निषेध केला आहे. तसेच शासनाने कारवाई मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच दूध संकलन केंद्रांना परवानगी मिळाली पाहिजे, अशी मागणीही केली.स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शासनाच्या आदेशाची ओळी करून जोरदार घोषणाबाजी केली. सहकारी दूध संस्था बंद करू नयेत, या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. आंदोलनात सुरेश पाटील, शरद पाटील, सदाशिव सपकाळ, रावसाहेब पाटील, आनंदा पाटील, जयकुमार पाटील, गजानन मगदूम आदी उपस्थित होते.स्वतंत्र भारत पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, दूध संस्थांनी समाधानकारक खुलासा करावा, अन्यथा कायमस्वरुपी संबंधीत संस्था बंद करण्यात येतील, असा शासनाने आदेश दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचा हा आदेश ग्रामीण भागातील छोट्या दूध संघांवर अन्यायकारक व जुलमी आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादक संस्था खासगी दूध संघांना दूध पुरवठा करून शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देत आहेत. यामुळे शासनाने सहकार मोडीत काढणारा आदेश त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

हुकूमशाही पध्दतीची कारवाई : सुनील फराटेवर्षातून दोनवेळा यात्रा व दिवाळीसारख्या मोठ्या सणाला फरक बिले दूध संस्था शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी उसनवार न करता आनंदाने पार पडत आहेत. अशा छोट्या दूध संघांना शासनाने प्रोत्साहन देण्याऐवजी केवळ जिल्हा, तालुकास्तरीय दूध संघांना दूध पुरवठा करीत नाहीत. खासगी दूध संघांना दूध पुरवठा करतात म्हणून अवसायनात काढून अवसायक नेमणे हे हुकूमशाही पध्दतीने सहकार विभागाने कारवाई केली आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध