शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव नसणाऱ्यांना पुरस्कार

By admin | Updated: September 4, 2015 22:40 IST

जिल्हा परिषद : शिक्षण विभागाचा सावळागोंधळ

सांगली : जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक होऊन विशेष महिला शिक्षक गुणवंत पुरस्कार गुरुवारी पडवळवाडी (ता. वाळवा) येथील संजीवनी जाधव यांना जाहीर झाला. मात्र या शिक्षिकेने आपण प्रस्तावच पाठविला नसल्याची तक्रार केल्यानंतर शुक्रवारी शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतींनी स्नेहा सूर्यकांत जाधव (रेठरेधरण, ता. वाळवा) यांना पुरस्कार जाहीर करून वादावर पडदा टाकला.शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी गुणवंत शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. प्रस्तावांची छाननी करून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची निवड समिती त्यातून निवड करते. मात्र राजकारणी मंडळींची शिफारस असल्याशिवाय निवडच होत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. यामध्ये काही प्रमाणात तथ्य असल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. पडवळवाडी शाळेतील शिक्षका संजीवनी जाधव यांना यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी यंदा पुरस्कारासाठी अर्जही केला नव्हता, तरीही त्यांना पुरस्कार जाहीर झाला. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण प्रस्तावच पाठविला नसताना विशेष महिला गुणवंत शिक्षक पुरस्कार कसा जाहीर झाला, असा प्रश्न विचारला. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी आणि निवड समितीमधील पदाधिकाऱ्यांचे डोळे उघडले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती लिंबाजी पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून, प्रस्ताव नसताना या शिक्षिकेला पुरस्कार कसा जाहीर झाला, असा सवाल केला. हे गंभीर असून यापुढे असले प्रकार चालणार नाहीत, असा इशारा दिला. हा गोंधळ लक्षात आल्यानंतर रेठरेधरण येथील शाळा क्रमांक तीनमधील शिक्षिका स्नेहा जाधव यांना हा पुरस्कार जाहीर केला गेला. आमच्या चुकीमुळे पुरस्काराचा गोंधळ झाला आहे, तुम्हाला जिल्हा परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला असून सत्कार कार्यक्रमासाठी शनिवारी उपस्थित राहा, अशी सूचना लिंबाजी पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)निवड समितीबाबत शिक्षकांना शंकाजिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा निवड समितीत समावेश असतो. या सदस्यांनी प्रस्ताव नसणाऱ्या महिला शिक्षकेस पुरस्कार कसा जाहीर केला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रस्ताव असणाऱ्या शिक्षकास मात्र डावलण्यात आले. या प्रकारामुळे निवड समितीवर शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.