शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला जागरण; विधानसभेला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:10 IST

तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती, आघाडी बासनात गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २१ गावांतील दोन्ही गटांकडून सोयीनुसार, निष्ठेच्या गोंधळाचा संबळ वाजणार असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देलोकसभेला जागरण; विधानसभेला गोंधळनिष्ठेच्या गोंधळाचा संबळ वाजणार

दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती, आघाडी बासनात गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २१ गावांतील दोन्ही गटांकडून सोयीनुसार, निष्ठेच्या गोंधळाचा संबळ वाजणार असल्याचे दिसून येत आहे.युती, आघाडी, पक्षनिष्ठा, नेत्यांवरची निष्ठा, या शब्दांची जागा आयाराम आणि गयारामांनी घेतली. मात्र या सर्वांनाच छेद देत विसापूर सर्कलमध्ये एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. राजकारणाच्या प्रचलित परंपरांना छेद देणाऱ्या या पॅटर्नची चर्चा सध्या तासगावसह खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.मांजर्डे आणि विसापूर जिल्हा परिषद गटातील २१ गावांचा खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत खा. संजयकाका पाटील यांना मानणारा भाजपचा गट, तर आ. सुमनताई पाटील यांना मानणारा राष्ट्रवादीचा गट असे दोन गट आहेत. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांनी युती, आघाडी धर्माचे पालन करून स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला.या मतदारसंघाचे आ. अनिल बाबर यांनीही युती धर्माचे पालन करून खा. संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा केली. त्यावेळी आमदार बाबरांचा पैरा फेडण्याची ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही दिली.लोकसभा निवडणुकीनंतरही काही काळ युती, आघाडीचे गोडवे सुरू राहिले; मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा समीकरणे बदलली. लोकसभा निवडणुकीच्या काळात आ. बाबर यांनी भाजपच्या खा. संजयकाकांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. यावेळी भाजपचे शिलेदार व्यासपीठावर होते.दोन दिवसांपूर्वी मांजर्डेत विकासकामांचे औचित्य साधून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांनी २१ गावांतील राष्ट्रवादीची मोट बांधली. या व्यासपीठावर आ. बाबर यांनी हजेरी लावली. विकासकामांचे निमित्त असले तरी, २१ गावांतील राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी विधानसभेला आ. बाबर यांना रसद देण्याचे संकेत दिले आहेत.राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आ. बाबर येणार असल्याचे स्पष्ट होताच, मांजर्डेतील भाजपचे पदाधिकारी सचिन पाटील यांनी स्नेहभोजनाचे औचित्य साधून माजी आ. सदाशिवराव पाटील यांना बोलवत वरकडी केली. विसापूर सर्कलमधील २१ गावांतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची लोकसभेनंतर पुन्हा सदाशिवराव पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे लोकसभेला निष्ठेचे जागरण करणाऱ्या २१ गावांतील कारभाऱ्याकडून विधानसभा निवडणुकीत नवा राजकीय गोंधळ घडविण्यासाठी संबळ वाजवण्यास सुरुवात झाल्याचे आता संकेत मिळत आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली