शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Sangli-प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी टाळा, सहकार्य करा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 18:47 IST

CoronaVirus JayantPatil Sangli- गेल्या वर्षाभरामध्ये कोरोनाचा हाहाकार आपण पाहिला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्यावेळी रुग्णांना खाटांची संख्या कमी पडली, हॉस्पिटल्स संपुर्ण भरलेली होती. त्यामुळे आता ज्या वेगाने सांगली जिल्ह्यात व सांगली महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजाराच्या ठिकाणी गर्दी टाळा, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी टाळा आणि सहकार्य करापालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आवाहन

सांगली : गेल्या वर्षाभरामध्ये कोरोनाचा हाहाकार आपण पाहिला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्यावेळी रुग्णांना खाटांची संख्या कमी पडली, हॉस्पिटल्स संपुर्ण भरलेली होती. त्यामुळे आता ज्या वेगाने सांगली जिल्ह्यात व सांगली महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजाराच्या ठिकाणी गर्दी टाळा, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजाराच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या उरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अर्थव्यवस्था संकटात येते. पण गर्दी थांबविली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. त्यामुळे बाजारात जाणे टाळा, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

मास्क घालणे, स्वच्छ हात धुणे, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडणे, योग्य अंतर ठेवणे व इतरांचीही तेवढीच काळजी घेणे या गोष्टींचे पालन करावे, आपण मर्यादा सांभाळल्या तर महिन्याभरामध्ये ही लाट खाली येईल. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. हीच आपल्याला नम्र विनंती आहे. मागील वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसल्यास सर्व नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली