शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

मतभेद टाळून प्रामाणिक काम करा

By admin | Updated: July 19, 2016 00:15 IST

रवी भुसारी : गुड्डापूर येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रशिक्षण शिबिर

नेवरी : काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली व देश कॉँग्रेसमुक्त होत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून काम केल्यास निश्चित भाजपमय भारत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राज्य संघटनमंत्री रवी भुसारी यांनी केले. गुड्डापूर (ता. जत) येथे भाजपचे जिल्हा कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिर तीन दिवस झाले. या शिबिराच्या समारोपात भुसारी बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, रवी अनासपुरे, आ. विलासराव जगताप, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख अध्यक्षस्थानी होते. भुसारी म्हणाले की, भाजपमय भारत करावयाच्या कामाला युवकांनी प्राधान्य द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२५ कोटी भारतीयांची मान उंचावणारी कामगिरी केली आहे. हे सर्व केवळ संघटनशक्तीच्या जोरावर केले आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे भाजप वाढवावा, आपोआप आपला देश भाजपमय बनेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. संजयकाका पाटील म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांच्या संघटना अधिक बळकट होण्यासाठी जिल्हा पातळीवर चांगले प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमधून द्रारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. याचे विरोधी पक्षांनी भांडवल करू नये. कारण ही योजना भाजप सरकारची आहे. लोकांना गॅस पुरवठा करण्यामध्ये काही गडबड असल्यास जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आमदार, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांची बैठक घेऊन, ही योजना ग्रामीण भागात व्यवस्थित पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी आमदार विलासराव जगताप, युवा नेते गोपीचंद पडळकर, सुधीर पाचोरकर, बाळासाहेब गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र भाजप समन्वयक मकरंद देशपांडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाश बिरजे, शेतकरी युवा मोर्चाचे रोहित दिवटे, महेंद्र करांडे, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, आनंदा गडदे, अमर इनामदार, शंकरसिंह मोहिते-पाटील, मंदाताई करांडे, सयाजीराव पवार, विजयराव पाटील, विलास पाटील, गोरखनाथ जानकर, सिध्देश्वर पाटील, सतीशराव पाटील, श्रीरंग सुतार, हिम्मतराव देशमुख, सुभाष घार्गे, दत्तात्रय सूर्यवंशी, प्रमोद सावंत, डॉ. रवींद्र आरळी, डॉ. श्रीपाद आष्टीकर, बंडोपंत देशमुख, रणधीर नाईक, अविनाश पाटील, डॉ. प्रताप पाटील, माणिकराव जाधव, शंकरअण्णा पाटील, दिनकरराव भोसले, अ‍ॅड. विनोद गुळवणी आदी उपस्थित होते. जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी यांनी आभार मानले. (वार्ताहर)