शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:49 IST

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंदवारणा धरणातून 3 हजार 603 तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग

सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज-निरंक (520.8), जत - निरंक (185.3), खानापूर-विटा -निरंक (320.4), वाळवा-इस्लामपूर -निरंक (724.9), तासगाव-निरंक (391.4), शिराळा 1.5 (1869), आटपाडी - निरंक (184.1), कवठेमहांकाळ -निरंक (296.9), पलूस -निरंक (425.5) व कडेगाव -निरंक (691.2).

जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3 हजार 603 क्युसेक्स तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

वारणा धरणातून 3 हजार 603 तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग दिनांक 12 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.18 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.34 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 10.03 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.87 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 116.10 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3 हजार 603 क्युसेक्स तर कोयना धरणातून 8 हजार 298 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 31 हजार 949 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 21 फूट 10 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 29 फूट 2 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच). 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSangliसांगली