शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पध्दतीला फाटा देत आईनेच केले विवाहाचे पौरोहित्य-सांगलीत मुलीचा आगळावेगळा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:54 IST

मराठा सेवा संघप्रणित जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील व डॉ. सुधीर पाटील यांची कन्या डॉ. अक्षया हिचा विवाह आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पार पडला.

ठळक मुद्देपुरोगामी पाऊल

सांगली : मराठा सेवा संघप्रणित जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील व डॉ. सुधीर पाटील यांची कन्या डॉ. अक्षया हिचा विवाह आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पार पडला. या लग्नात पारंपरिक पध्दतीला फाटा देत डॉ. निर्मला पाटील यांनीच मुलीच्या लग्नात पौरोहित्य केले. कर्मकांडांना थारा न देता झालेल्या या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.

परंपरेनुसार विवाह संस्कारात महिलांना स्थान नसते. पण ही पध्दत मोडून काढत डॉ. पाटील यांनी स्वत: मुलीच्या लग्नात सर्व संस्कार पार पाडले. आतापर्यंत आईने पौरोहित्य करण्याची ही पहिलीच घटना आहे. या विवाहात अपर्णा खांडेकर व जयश्री पाटील (आरग) यांनी शिवसेवक म्हणून काम पाहिले. वर्तमानात महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ही घटना महत्त्वाची ठरणार आहे.

या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अक्षतांसाठी धान्याचा वापर न करता उपस्थितांनी टाळ्या वाजवून वधु-वराचे अभिनंदन केले. पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कोणीही आहेर, पुष्पगुच्छ आणला नव्हता. उलट सिंदखेडराजा येथे उभारण्यात येणाऱ्या जिजाऊ सृष्टीसाठी देणगी पेटी ठेवण्यात आली होती. विवाहावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, वधु-वरांची शपथ आणि विवाहापूर्वी झालेला कुळ स्वागताचा समारंभ याप्रकारे हा विवाह समारंभ झाला. या आगळ्या-वेगळ्या विवाहाबद्दल नागरिकांनी डॉ. पाटील दाम्पत्याचे स्वागत केले.सांगलीत डॉ. निर्मला पाटील यांनीच मुलीच्या लग्नात पौरोहित्य केले.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न