शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जातीव्यवस्था पुन्हा जन्माला घालण्याचा प्रयत्न, डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केली भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:53 IST

डॉ. तारा भवाळकर यांना भाई वैद्य पुरस्कार प्रदान

सांगली : नव्या शैक्षणिक धोरणातून, हिंदुत्ववादाच्या विविध भुजांमधून, तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणांमधून देशात नव्याने जातीव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भीती आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केली.भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेच्या वतीने रविवारी सांगलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्वास रुग्णालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. अनिल मडके, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य उपस्थित होते.यावेळी डॉ. वैद्य म्हणाले, देशात वैदिक व अवैदिक हा दोन विचारांचा संघर्ष प्रदीर्घ काळापासून चालत आला आहे. अनेकविध मार्गाने विजय मिळवत बऱ्याचदा वैदिक विचार पुढे जाताना दिसतो. सध्या देशात याच विचारातून लोकसंस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसंस्कृती हीच खरी देशाची संस्कृती आहे. लोकांच्या जगण्यातून या संस्कृतीचे विविध प्रवाह तयार होतात. लोकसंस्कृतीमधील राम व रामायण वेगळ्या रूपातले आहे. आता विशिष्ट पद्धतीचा राम आपल्यावर लादला जातोय.डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, कमालीची तत्त्वनिष्ठता भाई वैद्य यांनी आयुष्यभर जपली. समाजासाठी त्यांनी केलेला त्याग मोठा आहे. ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले. भांडवलशाहीचा प्रभाव असणाऱ्या काळात प्रश्नांना भिडून त्यांनी त्यांचे कार्य उभे केले. साम्यवाद व भांडवलशाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्याची सरमिसळ त्यांनी होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल मला समाधान वाटते.

टॅग्स :Sangliसांगली