शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:56 IST

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

 सांगली - ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.भिडे म्हणाले, गेल्या तीन वर्षात मी वढू बुद्रुकला फिरकलेलो नाही. संभाजी महाराजांची समाधी आम्हाला श्रद्धा व स्फूर्ती देणारे स्थान आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीबाबत माझ्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी साबळेवहिनी म्हणतात की, भिडे गुरुजींना दगड मारताना मी पाहिले आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील, तर पोलिसांनी तपासून पाहावे, सत्य बाहेर येईल. प्रकाश आंबेडकर यांचा बोलविता धनी कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल करण्यासाठी माझे नाव घेण्यास आंबेडकरांना कोणी सांगितले, याचा उलगडा झाला पाहिजे. सर्व समाजाला कलंक लागेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. अगदी राज्यसभा, लोकसभेपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. शासनस्तरावर तसेच सीबीआयने चौकशी करून सत्य बाहेर काढावे. मी दोषी असेन तर मला देहांताची शिक्षा द्यावी.सिंहासन गेलेल्या मंडळींचे कारस्थान?काही राजकारणी नेते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून राजकीय फायदा उठविण्याचा डाव आखत आहेत. कर्जमाफीसाठी या मंडळींनी शेतकºयांचे आंदोलन पेटविले. शेतकºयांच्या बाजूने आंदोलन करणाºया नेत्यांनीही सरसकट कर्जमाफीची मागणी केली. पण यातील अनेक नेत्यांचा दोनशे-चारशे टन ऊस दरवर्षी जातो. या नेत्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करताना काही विवेक आहे की नाही असेही भिडे म्हणाले.भिडेंना पोलीस संरक्षणकोरेगाव भीमा घटनेचे पडसाद सांगलीसह संपूर्ण राज्यभर उमटले असून, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यातील पाच पोलीस २४ तास त्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले आहेत.ब्राह्मण महासंघाचा या प्रकरणाशी संबंध नाहीपुणे : कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वादाशी महासंघाचा काहीही संबंध नसून केवळ जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र आहे, असा दावा महासंघाकडून करण्यात आला आहे. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव