शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: आटपाडीची देशमुख सूतगिरणी जिल्हा बँक पुन्हा ताब्यात घेणार, कंपनीला पाठवली नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:55 IST

देशमुख सुतगिरणीवर जिल्हा बँकेचे १४ कोटी तसेच वस्त्रोद्योग मंडळाच्या माध्यमातून शासनाने दिलेले २४ कोटींचे भागभांडवल व अन्य देणी होती. 

सांगली : आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरणींची विक्री करताना जिल्हा बँकेने खरेदीदार कंपनीला शासकीय व अन्य देणी देण्याची अट घातली होती. मात्र संबंधित कंपनीने ही अट पाळली नाही. त्यामुळे सुतगिरणीचा फेर ताबा का घेऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस संबंधित कंपनीला पाठवली आहे. तसेच तातडीने ठरल्याप्रमाणे सुतगिरणीवरील अन्य देणी फेडण्याची सूचना केली आहे, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.देशमुख सुतगिरणीवर जिल्हा बँकेसह शासकीय व कर्मचाऱ्यांची देणी ४० कोटी होती. जिल्हा बँकेने लिलाव करताना १४ कोटींची थकबाकी भरून घेत सदरची सुतगिरणी देशमुख इंडस्ट्रिज कंपनीला विकली. कंपनीसोबत विक्री व्यवहार करताना बँकेने जिल्हा बँके व्यतिरिक्त सुतगिरणीवरील शासकीय व अन्य देणी खरेदीदार कंपनीने भागवावीत अशी अट घातली. देशमुख सुतगिरणीवर जिल्हा बँकेचे १४ कोटी तसेच वस्त्रोद्योग मंडळाच्या माध्यमातून शासनाने दिलेले २४ कोटींचे भागभांडवल व अन्य देणी होती. पण बँकेने वस्त्रोद्योग मंडळ, कंपनीच्या देण्याची जबाबदारी न स्वीकारता कर्ज वसूल करून अन्य देणी देण्याची जबाबदारी कंपनीवर टाकली. कंपनीने ही देणी दिली नसल्यामुळे वस्त्रोद्योग मंडळाने गंभीर दखल घेत जिल्हा बँकेच्या विरोधात सहकार आयुक्तांकडे तक्रारी केली. देशमुख सुतगिरणीच्या विक्री व्यवहारात जिल्हा बँकेने शासन तसेच सुतगिरणीच्या सभासदांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. व्यवहाराची चौकशी करून पुन्हा सुतगिरणी ताब्यात घेण्याची विनंती मंडळाने सहकार आयुक्तांकडे केली होती.सहकारी आयुक्तांनी सध्या जिल्हा बँकेच्या कारभाराची चौकशी करत असलेल्या पथकाला देशमुख सुतगिरणीच्या विक्रीची तसेच वस्त्रोद्योग मंडळाने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये वादळी चर्चा झाली. या प्रकरणी संचालक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने सुतगिरणी पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी संचालकांनी केली. बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी कायदेशीर अभिप्राय घेऊन कारवाई होईल असे सांगितले.

दोन महिन्यात १२० कर्जदारांवर कारवाई

जिल्हा बँकेने मार्च अखेर बँकेचा ढोबळ एनपीए १० टक्केपेक्षा कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. मोठ्या सहकारी संस्थांवर सिक्युरिटायझेशन ॲक्टनुसार कारवाई झाली आहे. गेल्या दोन महिन्यात १२० व्यापारी, उद्योजक व अन्य कर्जदारांवर सिक्युरिटायझेशन ॲक्टनुसार कारवाई केली आहे. कलम १०१ च्या कारवाईही सुरू आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक