शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कामात दिरंगाई, आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

By अशोक डोंबाळे | Updated: March 7, 2023 17:23 IST

ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा

सांगली : आटपाडी तालुक्यातील मॉडेल स्कूल, अंगणवाडी इमारत बांधकामासह अन्य कामांतील त्रुटी आणि ठेकेदाराला योग्य मार्गदर्शन करून कामे करून घेण्यात दिरंगाई केल्याबद्दल शाखा अभियंता आय. आय. बागवान यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी ही कारवाई केली आहे.मॉडेल स्कूल, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दलितवस्ती सुधार योजनेतील कामे दर्जेदार व्हावीत, अशी भूमिका घेऊन डुडी, ओसवाल यांनी जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत. आटपाडी, शिराळा, जत, कवठेमहांकाळ तालुक्यांतील कामांची तपासणी केली. यावेळी अनेक ठिकाणी नियमानुसार कामे झाली नाहीत, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिरंजे यांनीही शाखा अभियंता, ठेकेदारांना दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. तरीही आटपाडी तालुक्यात मॉडेल स्कूल इमारत, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र आणि दलितवस्ती योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. तरीही या ठेकेदारांची बिले शाखा अभियंता बागवान यांनी काढून दिली आहेत. या गंभीर त्रुटीबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांनी बागवान यांना निलंबित केले आहे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयही डुडी यांनी घेतला आहे.ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसावारंवार सूचना देऊनही ठेकेदारांनी शाळाखोल्या बांधकाम, दलितवस्ती सुधार योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. याबद्दल आटपाडी तालुक्यातील संबंधित ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीला उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद