शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत ३७ संस्था बिनविरोध

By admin | Updated: January 26, 2015 00:39 IST

सहकारला अच्छे दिन : विधानसभेनंतर नेत्यांना शहाणपण

आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी झालेल्या अभूतपूर्व चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण होण्याऐवजी गावोगावच्या कारभाऱ्यांनी या निवडणुकीत धडा घेतल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यातील ५५ सहकारी संस्थांपैकी तब्बल ३७ संस्थांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या प्राधिकरणामार्फत घेण्यात येत आहेत. यंदा आटपाडी तालुक्यातील ‘ब’ वर्गातील १७, ‘क’ वर्गातील ५५ आणि ‘ड’ वर्गातील ३१ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.विशेष म्हणजे यावेळी विधानसभेच्या चौरंगी लढतीचा उलटा परिणाम या सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर झालेला पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेची निवडणूक करून त्यासाठी होणारी कडवी गटबाजी, बेफाम पैसा खर्च आणि गावा-गावात निर्माण होणारी कटुता, शिवाय विजयी कोण होणार हेही अनिश्चित. त्यामुळे सामंजस्याने सर्व गट-तट विसरून बिनविरोध निवडणुका करण्याकडे कारभाऱ्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिनविरोध झालेल्या संस्थापळसखेल विकास सेवा संस्था, घरनिकी पतसंस्था, धुळाजीराव झिंबल पतसंस्था- लिंगीवरे, कृष्णा ग्रामीण पतसंस्था, शेटफळे, उमादेवी पत्की पतसंस्था करगणी, संजीवनी लोणार समाज पतसंस्था आटपाडी, बाबासाहेब देशमुख माणगंगा सेवक संस्था आटपाडी, आटपाडी विद्यार्थी ग्राहक भांडार, चंद्रभागा महिला विकास संस्था दिघंची, आर. आर. पाटील गारमेंट मॅन्युफॅक्चरिंंग सोसायटी दिघंची, सिद्धनाथ शेती उपयोगी साधन पुरवठा खुरसुुंडी, यशवंत विजय विकास संस्था माळेवाडी, भिंगेवाडी विकास संस्था, प्रगती पतसंस्था शेटफळे, अण्णासाहेब लेंगरे पतसंस्था आटपाडी, बाळेवाडी विकास संस्था, बिरुदेव विकास सेवा संस्था कुरुंदवाड, अहिल्यादेवी होळकर विकास संस्था निंबवडे, आटपाडी व्यापारी ग्रामीण पतसंस्था, धावडवाडी विकास संस्था, जकाईदेवी विकास संस्था मानेवाडी, विठ्ठल विकास संस्था ओटेवाडी, वसंत पतसंस्था दिघंची, जयभवानी विकास संस्था शेटफळे, राजेंद्रअण्णा देशमुख ग्राहक संस्था करगणी, लोकमान्य विकास संस्था निंबवडे, सिद्धनाथ विकास संस्था निंबवडे, वि. द. ऐवळे मागासवर्गीय औद्योगिक संस्था राजेवाडी, भैरवनाथ विकास संस्था शेटफळे, गीतलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था आटपाडी, विजयादेवी महिला विकास संस्था य. पा. वाडी, माणगंगा ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे घटक संस्था आटपाडी, माऊली स्वयंरोजगार संस्था लेंगरेवाडी, जयंत पाटील स्वयंरोजगार संस्था, श्री समर्थ स्वयंरोजगार संस्था, सिद्धिविनायक संस्था, श्री भैरवनाथ संस्था आटपाडी.)