शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

कोकरूड येथे सापडले दुर्मिळ मोठ्या पतंगापैकी एक "एॅटलास मॉथ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:12 IST

जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते.

ठळक मुद्देकोकरूड येथे सापडले दुर्मिळ "एॅटलास मॉथ"जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक

विकास शहा

शिराळा - जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते.वसाहतीमधील कार्यालय प्रमुख प्रकाश लांडगे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कुतूहलाने त्याचे फोटोही काढले. नंतर वसाहतीमधील कु. मिनाजुल सरदार मुजावर , अभिजित सकटे यांनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" आहे हे समजले.

जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये "एॅटलस मॉथ" गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला "एॅटलास मॉथ" म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते.

सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

८ इंच लांबीचे सर्वात मोठे पतंग

 दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" पतंग मादी असून साधारणपणे ८ इंच लांबीचे होते. हे पतंग विविध झाडांवर सुमारे २०० अंडी घालते. सोमवार दि.२१ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान हे पतंग पाहण्यास या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगली