शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

आटपाडी २३ वेळा दुष्काळाच्या फेऱ्यात; निसर्गाच्या सततच्या अवकृपेने दुष्काळग्रस्त हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:53 IST

माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे.

ठळक मुद्दे दुष्काळी स्थिती गंभीर : सरासरीइतकाही पाऊस नाही

अविनाश बाड ।

आटपाडी : आटपाडी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५५ मिलिमीटर एवढे आहे. निसर्गाच्या अवकृपेचा कहर म्हणजे, ज्या १९६५ मध्ये आटपाडी तालुक्याची निर्मिती झाली, तेव्हाही दुष्काळ पडला होता. त्यावर्षी ३२६ मि.मी. पाऊस पडला. १९५३ पासून आतापर्यंत एकूण २३ वर्षे तालुक्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. तालुका स्वतंत्र होण्यापूर्वी खानापूर तालुक्यात समावेश होता. आटपाडीच्या पावसाची आकडेवारी १९५३ पासूनची उपलब्ध आहे. त्यामध्ये तालुका वारंवार दुष्काळाला सामोरा गेल्याचे स्पष्ट होते; पण हा भाग काही अलीकडेच दुष्काळाला सामोरा जातोय अशातला भाग नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हा भाग औंध संस्थानचा भाग होता. १९३८ मध्ये लेंगरेवाडी येथे शाळेत शिक्षक म्हणून गेल्यानंतर दुष्काळ पडतो आणि स्थलांतरित झालेल्या रिकाम्या गावातून शिक्षक बाहेर पडतो. माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. गेल्या ६५ वर्षांत ८० च्या दशकानंतर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे प्रमाण खूपच वाढले आहे. १९७२ चा दुष्काळ अनुभवलेल्या आटपाडीकरांना पुढे सतत भंडावून सोडले आहे. १९८१ ते १९९० या दहा वर्षांत तब्बल ६ वर्षे तालुक्यात दुष्काळाने ठाण मांडले. १९८२ ते १९८६ सलग ५ वर्षे ३५५ मि.मी.पेक्षा तालुक्यात कमी पाऊस झाला. १९९० मध्ये आटपाडीत २८६ मि.मी. एवढाच पाऊस झाला. त्यावर्षी खरसुंडीत ४७२ मि.मी. पाऊस झाला.

आकडेवारीच्या सरासरीत त्यावर्षी ३७९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद असली, तरी त्याचा आटपाडी परिसरावरील दुष्काळाची दाहकता काही कमी होणार नाही. १९९१ ते २००० या दशकात तब्बल ५ वर्षे दुष्काळाची गेली. त्यात १९९१ आणि १९९२ ही सलग दोन वर्षे त्यानंतर एक वर्ष मध्ये गेले की लगेच १९९४ मध्ये सरासरीपेक्षा १११ मि.मी. पाऊस कमी पडला. पुन्हा २ वर्षांनी १९९७ मध्ये व २००० मध्ये दुष्काळी परिस्थितीने लोकांचे हाल केले.वाळवंटापेक्षा : कमी पाऊस!अरवली पर्वताने राजस्थानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पश्चिम राजस्थानात थर वाळवंट आहे. तिथले सरासरी पर्जन्यमान त्याच्याहून कमी म्हणजे ३५५ मि.मी. एवढे आहे. फक्त वाळवंटात वर्षभर तापमान अधिक असते. हाच काय तो फरक. पण वाईट म्हणजे आटपाडी तालुक्यात ३५५ मि.मी. एवढाही पाऊस होत नाही. या पावसाच्या नोंदी शासनदरबारी असूनही, २३ वर्षांपैकी फक्त ४ वर्षे टंचाईसदृश स्थिती आणि दुष्काळ जाहीर करण्यात आला.२००१ ते २०१० या दशकात सलग ६ वर्षे दुष्काळ पडला.२००१ ते २००६ : पर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शासनदरबारी फक्त १९७२ आणि २००३ च्या दुष्काळात उपाययोजना करुन त्याची नोंद केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी