शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

अटलबिहारी वाजपेयीचा सागरेश्वर दौरा राहूनच गेला- सु. धो. मोहिते यांच्याकडून आठवणीला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:30 IST

देशाचे माजी पंतप्रधान व तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी १४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांचे सांगलीतील सहकारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कारानिमित्त सांगली दौऱ्यावर होते. यावेळी मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी

ठळक मुद्देवृक्षमित्र धो. म. मोहिते यांची सांगलीत भेट

प्रताप महाडिककडेगाव : देशाचे माजी पंतप्रधान व तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी १४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांचे सांगलीतील सहकारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कारानिमित्त सांगली दौऱ्यावर होते. यावेळी मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी अटलजींची भेट घेतली होती. यावेळी मोहिते यांनी सागरेश्वर अभयारण्याची सचित्र माहिती देऊन अटलजींना सागरेश्वर अभयारण्यास भेट देण्याची विनंती केली. वाजपेयी यांनीही अभयारण्यास यथावकाश भेट देण्याचे मान्य केले. त्यानंतर अल्पावधीत अटलजी पंतप्रधान झाले. पुढे मोहिते यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. परंतु ६ सप्टेंबर २००० रोजी धो. म. मोहिते यांचे निधन झाले आणि अटलजींची सागरेश्वर भेट राहुनच गेली.

१४ नोव्हेंबर १९९५ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्ण दिवसभराचा सांगली दौरा होता. दुपारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कार समारंभासाठी अटलजी आले असताना वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी आपल्या काही सहकाºयांसमवेत अटलजींची भेट घेतली. त्यांच्याकडून अटलजींनी सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीचा इतिहास ऐकला आणि मानवनिर्मित अभ्यायरण्यातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी धो. म. मोहिते यांनी अटलजींना सागरेश्वर अभयारण्यास भेटीचे निमंत्रण दिले. वाजपेयी यांनीही यशावकाश वेळ काढून अभयारण्यास भेट देण्याचे आश्वासन दिले. या दौºयानंतर अल्पवधीतच अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. पुढे धो. म. मोहिते यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. पण ६ सप्टेंबर २००० रोजी धो. म. मोहिते यांचे निधन झाले. त्यानंतर याबाबत पाठपुरावा झाला नाही.सागरेश्वर अभयरण्यास अटलजींची भेट राहून गेल्याची खंत धो. म. मोहिते यांचे पुत्र रानकवी सु. धो. मोहिते यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :SangliसांगलीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी