शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अनाथांना लाभले आकांक्षांचे पंख

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

अनाथाश्रमातील यशोगाथा : दहावीच्या यशाने बहरली मने

अविनाश कोळी ल्ल सांगली कोणी कुटुंबाच्या अठराविश्वे दारिद्र्याने, कोणी पितृछत्र तर कोणी मातृछत्र हरपले म्हणून अनाथालयात आलेले... परिस्थितीने खचलेल्या मनांना आधार देण्यासाठी मदतीचे शेकडो हात सरसावले... भविष्याप्रती बेभरवसा वाटत असलेल्या इवल्याशा रोपट्यांना खतपाणी घालून वाढविण्यात आले. दहावीच्या निकालामुळे या चिमुकल्यांच्या आयुष्यात आता नवा बहर फुलून त्यांना आकांक्षांचे पंख लाभले आहेत. सांगलीतील वेलणकर अनाथाश्रम, मिरजेतील पाठक अनाथाश्रम येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खडतर प्रवास करून यशाला गवसणी घातली आहे. पाठक अनाथाश्रमातील अमोल ज्ञानू व्हनमाने याने ८१ टक्के गुण मिळविले. पितृछत्र हरपल्यानंतर तो येथे दाखल झाला होता. विद्यामंदिर प्रशालेत तो शिकत आहे. सांगलीच्या वेलणकर अनाथाश्रमातील सात मुलींनी दहावीचा टप्पा ओलांडताना मनी बाळगलेल्या स्वप्नांना बळ दिले. सुरेखा लक्ष्मण कागल या मुलीने ७२ टक्के गुणांसह गुजराती हायस्कुलमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने दारिद्र्याने खचलेल्या कागल कुटुंबावर मोठे संकट कोसळले. मुलीची सुरक्षितता आणि शैक्षणिक भविष्याकरिता आईने तिला अनाथाश्रमात दाखल केले. परिस्थितीने खचलेल्या या मुलीला आश्रमातील अन्य मुली, येथील कर्मचाऱ्यांनी आधार दिला. सुरेखाप्रमाणेच अन्य मुलींच्याही कहाण्या अशाच. दहावीचे यशोशिखर गाठण्याची किमया येथील सात मुलींनी केली. पौर्णिमा थोरात (६५ टक्के), पूजा कुलकर्णी (५५ टक्के), अश्विनी माने (५२ टक्के), स्वाती चिखलकर (४५ टक्के), माधुरी ढवळे (४१ टक्के) आणि शिवानी पाटील (३८ टक्के) या सात मुलींना आता उज्ज्वल भविष्याचे पंख लाभले आहेत. कोणाला शिक्षिका, कोणाला धावपटू, कोणाला वैद्यक शाळेतील तंत्रज्ञ बनायचे आहे. त्यांना बळ देण्याचे काम आता अनाथाश्रमामार्फत सुरू आहे. अनाथाश्रमाच्या अधीक्षक अनुराधा डुबल, समुपदेशक स्मिता सपकाळ, केसवर्कर आरती तळवळकर, गृहमाता शीला ओहल यांच्यासह सर्वच कर्मचारी आणि संस्थेचे अध्यक्ष रामसाहेब वेलणकर, सचिव अंजुताई वेलणकर यांच्याबद्दल या सर्व मुलींना आदर वाटतो. जडणघडणीचे श्रेय त्या सर्वांना देत आहेत.