शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बदलाकडे इच्छुकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:03 IST

महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यातील महासभेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देसव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण, महापौर बदलावर शिक्कामोर्तबमहासभेकडे इच्छुकांचे लक्ष

सांगली : महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यातील महासभेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.गेल्यावर्षी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सांगलीकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले. तब्बल ४० वर्षांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावत पहिल्यांदाच महापालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान संगीता खोत यांना मिळाला. खोत या पंधरा वर्षे नगरसेविका म्हणून काम करीत आहेत. त्यांनी विविध समितीत सदस्य, सभापती म्हणूनही काम केले होते. त्यामुळे त्यांचा अनुभव व ज्येष्ठता पाहून भाजपच्या नेत्यांनी महापौर पदाची सूत्रे त्यांच्या हाती दिल्याचे नेत्यांमध्ये चर्चा आहे.सुरुवातीला दहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने महापौर बदल करण्यात आला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र महापौर बदलासाठी इच्छुक नगरसेविकांनी आग्रह धरला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीत नगरसेवकांची बैठकही झाली. पण त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाल्याने हा विषय मागे पडला.

आता पुन्हा एकदा इच्छुक नगरसेविकांनी उचल खाल्ली आहे. महापौर बदलावर शिक्कामोर्तब झाले असून, खोत यांचा राजीनामा कधी होणार, असा सवाल इच्छुकांकडून केला जात आहे. डिसेंबर महिन्यातच राजीनामा व्हावा, यासाठी इच्छुक आग्रही आहेत.

त्यामुळे भावी महापौरांनाही किमान वर्षाचा कालावधी मिळेल. त्यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्याकडे तगादा लावला आहे. त्यात डिसेंबर महिन्याच्या महासभेत राजीनामा होईल, अशी चर्चा भाजपअंतर्गत सुरू आहे. पण महापौर खोत यांनी अद्याप महासभेची तारीखच निश्चित केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरSangliसांगलीBJPभाजपा