शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगाव खुर्द येथे आजोबांनी केले नातीचे जंगी स्वागत, हेलिकॉप्टरमधून आणले चिमुकलीला घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 17:07 IST

प्रताप महाडीक कडेगाव : कन्यारत्न झालं म्हणून वेगवेगळय़ा पद्धतीने आनंदोत्सव, स्वागत झाल्याचे आपण याआधीही पाहिले असेलच. असेच काहीसे हटके स्वागत ...

प्रताप महाडीककडेगाव : कन्यारत्न झालं म्हणून वेगवेगळय़ा पद्धतीने आनंदोत्सव, स्वागत झाल्याचे आपण याआधीही पाहिले असेलच. असेच काहीसे हटके स्वागत सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द गावात करण्यात आले. सरपंच असलेल्या आजोबाने आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टरमधून आणून केले आहे. अशोक जाधव असं या सरपंच आजोबांचे नाव आहे. त्यांनी आपल्या एकुलत्या एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाल्याने आपल्या नातीला पुण्याहून हेलिकॉप्टरने आजोळी घरी आणलं आणि मुलगी जन्माचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीने केले.शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वांगी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले आणि अशोक जाधव यांच्यासह जाधव कुटुंबीयांनी आपल्या नातीचे स्वागत व मुलगी जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या समाजाला अशोक जाधव यांनी काही वर्षांपूर्वीच आदर्श घालून दिला आहे.अशोक जाधव यांना स्नेहा ही एकच मुलगी आहे. या मुलीचा विवाह २७ नोव्हेंबर २०२० रोजी कुंडल येथील स्वातंत्र सेनानी स्व.कॅप्टन रामचंद्र लाड यांचे नातू दिग्विजय लाड यांच्याशी झाला. स्नेहा आणि दिग्विजय यांना २९ मार्च २०२२ रोजी कन्यारत्न  झाले. अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी उषा यांना नात झाल्याची बातमी कळताच आनंद झाला. आजी-आजोबांनी आपल्या नातीचे भव्य स्वागत करायचे ठरवले. त्याप्रमाणे आज  नातीचं अर्थात मुलीच्या जन्माचं स्वागत इतक्या भव्यतेनं करण्यात आलं की गावात एकच चर्चा झाली.मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत; पण इथे मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरलं  आणि मुलगी जन्माचा आनंद साजरा केला. जिथे मुलगा झाल्याचा आनंद साजरा केला जातो, तिथे मुलगी झाली तर घरात निराशा येते. अशोक जाधव यांनी मात्र नातीच्या जन्माचा भव्य आनंद सोहळा साजरा करून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.गावात स्वागत कमानीनातीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभारून फुलांची उधळण देखील केली होती. ज्यावेळी आई आणि मुलगी 'हेलिकॉप्टर'मधून उतरले त्यावेळी त्यांचे पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी बँड आणि झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूकही काढण्यात आली.यावेळी  गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही मुलीचा जन्म उत्सव साजरा करत आहोत. हा जीवनाचा उत्सव आहे,” असे अशोक जाधव यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली