शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तकांचा सांगली जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या, अधिकाऱ्यांवर केला आरोप

By अशोक डोंबाळे | Updated: September 25, 2023 18:44 IST

सांगली : महाराष्ट्र शासन राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तकांना कसलाही मोबदला न देता ऑनलाइन कामे केलीच पाहिजेत, अशी ...

सांगली : महाराष्ट्र शासन राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तकांना कसलाही मोबदला न देता ऑनलाइन कामे केलीच पाहिजेत, अशी सक्ती करत आहे; परंतु या कामाचा मोबदला शासनाकडून मिळत नसल्यामुळे आशांनी ही कामे फुकट करावीत, अशी अपेक्षा आरोग्य अधिकाऱ्यांची आहे. शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आशा व गटप्रवर्तक महिलांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात तासभर ठिय्या मारला.आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या सुमन पुजारी, शंकर पुजारी, अंजली पाटील, अफसाना शिकलगार, सुमया मुरसल, ललिता पाटील, दीपाली लोहार, सुनीता पाटील, मनीषा कदम, वर्षा पाटील, शमशाद फकीर, वैशाली कोळी, ऊर्मिला पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, आशा महिलांची कामावर आधारित मानधनावर नेमणूक केलेली आहे. त्यांना पगार दिला जात नाही. जे काम केले जाईल त्याचा मोबदला दिला जातो. त्यामुळे फुकट काम करून घेण्याचा अधिकार आरोग्य अधिकाऱ्यांना नाही. इतकेच नव्हे, तर ऑनलाइन कामे न करणाऱ्या आशांना कामावरून काढून टाकले जाईल, अशा धमक्या दिल्या जातात. या अन्यायाविरुद्ध युनियनचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. आशांना जबरदस्तीने काम करण्यास सांगणे हा ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सक्तीचे काम करणे सांगण्यास बंद न केल्यास त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही शंकर पुजारी यांनी दिला आहे.

आशांना कामाची सक्ती नाही : तृप्ती धोडमिसेआरोग्य केंद्रामध्ये आशा या सेवा म्हणून काम करीत आहेत. या आशांना कामावर आधारित मोबदला दिला जात आहे. यामुळे यापुढे आरोग्य केंद्रामध्ये एकाही आशांना कामाची सक्ती केली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद