शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडांगण नसल्याने सांगली महापालिकेच्या दारात मुलांनी खेळले क्रिकेट

By अविनाश कोळी | Updated: June 11, 2024 17:16 IST

खासदार, आमदारांच्या नावे झळकविले फलक

सांगली : शामरावनगर परिसरात एकही क्रिडांगण नसल्याने येथील शाळकरी मुलांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात क्रिकेट खेळून अनोखे आंदोलन केले. खासदार व आमदारांनी क्रीडांगणावर केलेल्या फलंदाजीची छायाचित्रे झळकावत ‘आम्ही कुठे खेळायला जायचे?’ असा फलक झळकावत या प्रश्नाकडे लक्ष वेधले.शामरावनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सांगलीतील महापालिकेच्या दारात मुलांनी घोषणाबाजी केली. ‘आयुक्तकाका क्रीडांगण द्या’, ‘सुविधा नाहीत, क्रिडांगण तरी द्या’, ‘आम्ही खेळायचे तरी कुठे’, असे सवाल करणारे फलक झळकविण्यात आले. त्यानंतर क्रिकेट व कबड्डीचा खेळही महापालिकेच्या दारात मांडला. महापालिकेलाच क्रीडांगणाचे स्वरुप देत अनोखे आंदोलन करण्यात आले.दळवी यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेली कित्येक वर्षे शामरावनगर हा भाग समस्यांनी व्यापलेला आहे. या भागात मोकळे प्लॉट व महापालिकेचे खुले भूखंड आहेत. यामध्ये पावसाचे पाणी व सांडपाणी साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. हे चित्र बारा महिने शामरावनगरमध्ये पहावयास मिळते. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतेच क्रीडांगण या भागात नाही.मागील दोन आयुक्तांना आम्ही वारंवार निवेदने देत आंदोलनेही केली. तरीही महापालिका प्रशासन व मागील नगरसेवक, आमदार, खासदार यांनी या भागासाठी तसेच येथील लहान मुलांना व वृद्धांना उपयोग होईल असा खुला भूखंड विकसित केला नाही. येथील लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे लहान मुलांना रस्त्यावर खेळताना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरी सुविधा नसल्या तरी किमान एखादे क्रिडांगण तरी या भागात विकसित करावे, अशी आमची मागणी आहे. नव्या आयुक्तांनी तरी याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सहाय्यक आयुक्तांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात अर्णव कोळी, अबू शेख, अथर्व मोटे, आरुष दळवी, रुद्र कोरे, प्रथमेश धुमाळ, वेदराज दळवी, गोवर्धन भाट, जावेद मुल्ला, श्रावणी दळवी, रियान नदाफ, आराध्य सोनाळे, अक्षय कांबळे आदी मुलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Sangliसांगली