शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

पगार वेळेवर होत नसल्याने उचले टोकाचे पाऊल, सांगली जिल्ह्यातील एसटी चालकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 11:46 IST

गावामध्ये काही काळ तणाव

शिरढोण : पगार वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक चणचणीमुळे वैफल्यातून कवठेमहांकाळ एसटी आगारात कार्यरत भीमराव रावसाहेब सूर्यवंशी (वय ५०, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ) या बसचालकाने शिरढाेण येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.गेल्या दाेन वर्षांपासून पगार नियमित हाेत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक काेंडी झाली आहे. गेली २० ते २५ वर्षे कवठेमहांकाळ बस आगारात वाहनचालक पदावर कार्यरत असलेले सूर्यवंशी हेदेखील माेठ्या आर्थिक अडचणीत हाेते. घराची सर्व जबाबदारी भीमराव सूर्यवंशी यांच्यावरच होती. गेल्या दाेन वर्षांत वेळेवर पगार होत नसल्याने ते वैफल्यग्रस्त हाेते. काही दिवसांपूर्वी पत्नीचे सोने मोडून त्यांनी गावातील काही देण्या-घेण्याचे व्यवहार मिटवले होते.यानंतरही आर्थिक चणचण असल्याने ते जानेवारी महिन्याचा पगार जमा होण्याच्या प्रतीक्षेत हाेते. मात्र, बुधवारी १५ तारीख उजाडली तरीही पगार न झाल्याने ते तणावाखाली हाेते. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी कुटुंबासमवेत जेवण केले. रात्री घरातील सर्वजण झाेपी गेल्यानंतर स्वयंपाकघरातील तुळईला त्यांनी गळफास घेतला. सकाळी हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला.घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कवठेमहांकाळ बस आगारातही काही काळ बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.गावात तणावसूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याची घटना समजताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह तालुका आगार प्रमुख महेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. वेळेवर पगार होत नसल्याने आर्थिक चणचणीतून सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चेनंतर तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. विविध एसटी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संप