शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वडील पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 14:46 IST

बेडग येथील शेतकरी दाजी आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे यांच्यात गेल्या काही महिन्यापासून  पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता.

मिरज : बेडग ता.मिरज  येथे वडील जमीन नावावर करीत नाहीत व पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले. दाजी गजानन आकडे ( वय 70) यांच्या खूनप्रकरणी  मुलगा  लक्ष्मण आकळे (वय 32) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

बेडग येथील शेतकरी दाजी आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे यांच्यात गेल्या काही महिन्यापासून  पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. मुलगा लक्ष्मण वडील दाजी यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. त्याच्या हिस्स्याची जमीन नावावर करण्यासाठीही त्याने वडिलांकडे तगादा लावला होता. मात्र त्यास पैसे देण्यास व जमीन नावावर करण्यास  वडील नकार देत होते.

रागातून  लक्ष्मण याने  बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेल्या दाजी यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर घालून त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडले. यात दाजी आकळे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी बेडग येथे जाऊन लक्ष्मण आकळे यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. वडिलांच्या खून प्रकरणी  लक्ष्मण याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यास  अटक करण्यांत आली आहे.

टॅग्स :Sangliसांगली