मिरज : नाभिक संघटनेच्या मिरज शहर अध्यक्षपदी अरविंद बाबूराव कदम यांची निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सभा मिरज येथील गर्डर विठ्ठल मंदिरात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
सभेत मिरज शहरामध्ये श्री संत सेना महाराज मंदिर बांधण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. मावळते शहराध्यक्ष विजय अस्वले यांचा कार्यकाल संपल्यामुळे नूतन शहराध्यक्ष पदाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी इच्छुकांची मते जाणून जिल्हाध्यक्ष अनिल काशिद यांनी मिरज शहराध्यक्षपदी अरविंद कदम यांची निवड घोषित केली. यावेळी राज्य संघटक शशिकांत गायकवाड, जिल्हा सचिव शरद झेंडे, जिल्हा सदस्य बाळासाहेब अस्वले, राजू जाधव, राजू खराडे, बाळासाहेब अस्वले, विनोद शिंदे, अभिजित शिंदे, तसेच युवक कार्यकारिणीचे कपिल सूर्यवंशी, अरूण कदम, विनोद लोणकर, आनंदा जाधव, मारुती काळे, संदीप अस्वले, महेश जाधव, सुनील सोनकर, स्वप्नील लोणकर व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
फाेटाे : २३ ग्राम १
ओळ : मिरज शहर नाभिक संघटनेचे नूतन अध्यक्ष अरविंद कदम यांचा जिल्हाध्यक्ष अनिल काशिद यांनी सत्कार केला. यावेळी राज्य संघटक शशिकांत गायकवाड, जिल्हा सचिव शरद झेंडे, विजय अस्वले, राजू जाधव, बाळासाहेब अस्वले उपस्थित हाेते.