फोटो ओळ : कुंडल (ता पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अरुण लाड, ॲड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, विराज नाईक, किरण लाड, शरद लाड आदी उपस्थित होते.
पलूस : अरुण लाड यांचा चेहरा सोज्वळ आहे आणि मागची गँग ही टेरर आहे. त्यामुळे कोणी काहीही फुटकळ वक्तव्ये केली तर त्यांना जास्त महत्व देऊ नका, ज्यांची विश्वासार्हता आधीच ढासळलेली आहे त्यांच्यावर वक्तव्य करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.
कुंडल (ता. पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, जिल्हाध्यक्ष विराज नाईक, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नितीन नवले, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, युवती अध्यक्ष पूजा लाड प्रमुख उपस्थित होते.
अविनाश पाटील म्हणाले, जिल्हाभर राष्ट्रवादी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलत आहे. पलूस आणि कडेगाव तालुक्यात अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चांगले काम करत आहे. त्यामुळे यांच्याच शिरावर ज्यांनी आजवर अनेक पदे भोगली तेच आज त्यांच्यावर टीका करत आहेत. अशी बालिश वक्तव्य करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते.
आमदार अरुण लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचाराने हा पक्ष काम करतोय. राष्ट्रवादी पक्षाकडे युवकांचे संघटन चांगले आहे. नीतिमूल्ये असणाऱ्या पक्षाला ताकद देण्यासाठी युवकांनी जीवाचे रान करावे. अच्छे दिन आणणार म्हणणार मोदी सरकार ने देशातील प्रत्येक घटकाला अस्वस्थ केले आहे. त्यामुळे बापूंच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाला ताकद देण्यासाठी तळातील माणसापर्यंत आपली ध्येयधोरने रुजवा.
यावेळी अरुण पवार, मारुती चव्हाण, वैशाली मोहिते, नंदा पाटील, अरुणा जाधव, मृणाल पाटील, जयदीप यादव, सुरेश शिंगटे, अॅड इम्रान तहसीलदार, पोपट संकपाळ, मोहन पाटील, विनायक महाडिक, प्राजक्ता जाधव आदी उपस्थित होते.