शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 16:43 IST

Sangli News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे.

ठळक मुद्देवेरळा संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधनअरुण चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सांगली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे.कवठेपिरानमध्ये जन्मलेल्या अरुण चव्हाण यांनी शिक्षणानंतर काही काळ अ‍ौरंगाबादला डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात व कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात असिस्ट्न्ट रजिस्ट्रार म्हणून काम केले होते. त्यानंतर सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

यादरम्यान, खानापूर तालुक्यातील दुष्काळी शेतीशी त्यांचा संपर्क आला. पावसाअभावी नुकसानीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेतून वेरळा विकास संस्थेची स्थापना केली. स्वयंसेवी संस्थेची संकल्पना फारशी अस्तित्वात नसल्याच्या काळात म्हणजे २ ऑक्टोबर १९६९ रोजी वेरळा संस्थेचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रवास सुरु झाला. या प्रवासात त्यांना सदाभाऊ गुळवणी, भगवानराव सव्वाशे, धोंडिराम माळी, रामतात्या जाधव यांची साथ मिळाली.संस्थेने शेतकऱ्यांसाठी ३७ नाला बंधारे, दोन पाझर तलाव, १०४ एकर क्षेत्रात वनीकरण, रस्ते, शाळा अशी कामे उभी केली. देशिंग व खरशिंग परिसरात वनीकरण, कवठेपिरानला क्षारपड विकास असे प्रकल्प राबवले. शालाबाह्य मुलांसाठी घरबांधणी प्रशिक्षण केंद्र, महिला व मुलींसाठी वेगवेगळे प्रकल्प, आरोग्यासाठीची कामे चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून केली आहेत.संस्थेच्या कामांमुळे आळसंद, वाझर, कमळापूर, खानापूर आदी भागात हिरवाई फुलली आहे. कृषीभूषण प्र. शं. ठाकूर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू