शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कापडाच्या तुकड्यांतून साकारली सांगलीत शिवराज्याभिषेकाची कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 12:24 IST

सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

ठळक मुद्देकापडाच्या तुकड्यांतून साकारली शिवराज्याभिषेकाची कलाकृतीश्रुती दांडेकर यांचा उपक्रम : सांगलीत सादरीकरणकलाकृती जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प

सांगली : सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.शिवराज्याभिषेकाची कलाकृती भारतात प्रसिद्ध आहे. तिला जागतीक पातळीवर नेण्याचा माझा प्रयत्न असल्याचे दांडेकर यांनी सांगितले. आता ही क्विल्ट २५ ते २७ जानेवारी चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण असणार आहे.क्विल्ट म्हणजे आजीबार्इंच्या गोधडीचे आधुनिक रुपडे. भारतात अगदी पूर्वापार चालत आलेल्या, पण हळूहळू कालबाह्य होत चाललेल्या या कलेला गेल्या काही वर्षांत नवजीवन मिळाले आहे. अधिकाधिक स्त्रियांनी ही कला शिकावी याकरिता श्रुती मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, पुणे व सांगली येथे अनेक वर्कशॉप घेतात.

क्विल्टमध्ये पोर्ट्रेट करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांनी दहा महिन्यांपूर्वी शिवराज्याभिषेक कलाकृतीचे क्विल्ट हाती घेतले. त्यासाठी ७०८ तास त्यांनी परिश्रम घेतले. या क्विल्टमध्ये अगदी ३ मि.मि. इतके लहान तुकडेही आहेत. तब्बल २८८ रंगाचे २० हजार ८८८ तुकडे जोडून ही क्विल्ट तयार करण्यात आली आहे. तिचे शिवणकाम पुण्यातील स्टुडियो बानी येथील मनीषा अय्यर यांनी केले आहे. या क्विल्टसाठी श्रुती यांना बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले.आभाळमाया फाउंडेशनच्यावतीने येथील रोटरी क्लब हॉल, गणेशनगर, येथे शिवराज्याभिषेक या क्विल्टचे सादरीकरण करण्यात आले. कला शिक्षिका भारती क्षीरसागर यांच्या हस्ते क्विल्टचे अनावरण करण्यात आले. आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, भारती विद्यापीठाचे डॉ. नितीन नायक, तानाजीराव मोरे, रोहित दांडेकर, आदि दांडेकर, अरुण दांडेकर, डॉ. जया कुऱ्हेकर, सुमेध शहा इत्यादी उपस्थित होते. 

शिवराज्याभिषेकाची कलाकृती ही कलाक्षेत्रातील एक मानदंड आहे. अनेक प्रकारात ही कलाकृती आपल्यासमोर आली आहे. क्विल्ट स्वरुपात ही कलाकृती तयार करण्याचा विचार बऱ्याच वर्षापासून मनात होते. दहा महिन्यापूर्वी हे काम हाती घेतले. शिवरायांची महती महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. ही महती आपल्या कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जावी अशी इच्छा होती. आता ही इच्छा पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.- श्रुती दांडेकर, डिझायनर 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली