शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ऐटबाज युवराजाची कुंडलच्या डोंगरावर वर्षा सहल, तुरेवाल्या भारीट पक्ष्याने वेधले लक्ष

By श्रीनिवास नागे | Updated: September 14, 2022 15:13 IST

उन्हाळी हंगामात पंजाब, हरियाणासह काश्मिर खोऱ्यात आढळणारा हा पक्षी रूबाबदारपणामुळे लक्षवेधक ठरत आहे.

सांगली : पलूस तालुक्यातील क्रांतीभूमी कुंडल परिसरात सध्या वर्षा सहलीला आलेल्या ऐटबाज युवराज (तुरेवाला भारीट) पक्ष्याने तळ ठोकला आहे. डोकीवर तांबूस-काळा तुरा असलेल्या युवराज पक्ष्याचा मुक्काम पक्षीप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळी हंगामात पंजाब, हरियाणासह काश्मिर खोऱ्यात आढळणारा हा पक्षी रूबाबदारपणामुळे लक्षवेधक ठरत आहे.कुंडलला अतिशय समृद्ध निसर्गसौंदर्य लाभले आहे. सह्याद्री पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकाला असणारा कुंडलचा डोंगर पानाफुलांच्या हिरवाईने बहरून गेला आहे. या डोंगरावर झरी पार्श्वनाथ हे जैन धर्मीयांचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. तेथे डोक्यावर जिरेटोपासारखा तांबूस-काळा तुरा मिरवणारा युवराज पक्षी कधी डोंगराच्या पाषाणावर, कधी झाड-वेली, तर कधी पॅगोडावर बसून जणू काही श्रावणगीत गातो आहे. या ऐटबाज युवराजाच्या काळ्या पोटावर तपकिरी रंगाचे चिलखत घातल्यासारखे पंख उठून दिसतात.युवराज पक्ष्याला ‘तुरेवाला भारीट’ नावाने ओळखले जाते. याशिवाय शेंडीवाला रेडवा, लहान काकड कुंभार, बोचुरडी, डोंगरफेंसा, दाबुडका, फेंस किंवा शेंडूरला फेंसा अशी त्याला अन्य नावेदेखील आहेत. ‘इबर्ड’सारख्या संकेतस्थळावरील नोंदीवरून हा पक्षी पावसाळा-हिवाळ्यात गुजरात, महाराष्ट्रात आढळतो. उन्हाळ्यात भारताच्या उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये स्थलांतर करतो.

चिमणीच्या आकाराचा हा युवराज पक्षी रंगाने भारद्वाजसारखा असून हा डोंगराळ भागात आढळणारा पक्षी आहे. याची मादी मात्र चंडोलसारखी भुऱ्या रंगाची असते. कुंडल डोंगर परिसरात हा युवराज डिसेंबपर्यंत मुक्कामी असल्याची माहिती पक्षी अभ्यासक संदीप नाझरे यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली