शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राज ठाकरेंना दिलासा! शिराळ्यातील खटल्यात अटक वॉरंट रद्द; गेल्या १४ वर्षांपासून खटला प्रलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 12:15 IST

आठ जणांना अजामीनपात्र अटक वॉरंटचा हुकूम

शिराळा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दहा जणांचा सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्याचा विनंती अर्ज शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती प्रीती अ. श्रीराम यांनी नामंजूर केला. तसेच आठ जणांना अजामीनपात्र अटक वॉरंटचा हुकूम काढला आहे. तर राज ठाकरे व शिरीष पालकर यांचा अजामीनपात्र अटक वॉरट रद्द केले आहे. पुढील सुनावणी दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे २००८ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांना अटक झाली म्हणून आंदोलन केले होते. या आंदोलनाचा खटला येथील न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचे नाव या खटल्यातून वगळावे असा अर्ज प्रथम वर्ग न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी फेटाळला होता.सोमवारी सुनावणीवेळी राज ठाकरे हे राजकीय नेते आहेत त्यांना सभेसाठी परगावी जावे लागले, शिरीष पालकर यांना घरगुती कामासाठी परगावी जावे लागले आहे. तसेच तानाजी सावंत यांच्यासह आठ जण नोकरी व कामधंद्यासाठी परगावी जावे लागले आहे. त्यामुळे या सर्वांना अनुपस्थित राहण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज आरोपीच्या वतीने ॲड. विजय खरात, ॲड. सतीश कदम, ॲड. रवी पाटील यांनी दिला होता.याबाबत सरकारी वकील संदीप पाटील यांनी सर्वांसाठी कायदा समान आहे, राजकीय सभासाठी व घरगुती कामासाठी अनुपस्थित राहणे हे कायद्यास अनुसरून नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर व्हावा व त्यांचे विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे अशी हरकत घेतली.दहा आरोपींचा अर्ज नामंजूर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायाधीश प्रीती अ. श्रीराम यांनी सर्व दहा आरोपींचा अर्ज नामंजूर केला. तसेच अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होता. यानंतर आरोपींच्या वकिलांकडून राज ठाकरे व शिरीष पालकर यांचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याचा विनंती अर्ज दाखल करण्यात आला. तो मंजूर होऊन या दोघाचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय