सांगली : पुण्यातील लोकसेवा ॲकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करीत आहोत. याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
वेटम यांनी म्हटले आहे की, पुण्यातील हातनुरे यांनी संयुक्त पूर्व परीक्षाबाबतचा व्हिडिओ प्रसारीत केला आहे. यामधून महात्मा जोतिबा फुले यांच्या आजारपणाबाबत तसेच त्यांच्या मृत्यूसंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून जाहीरपणे अपमानित केले आहे. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होताच लोकांमध्ये रोष, संतापाची भावना निर्माण झाली. लोकांचा आक्रोश वाढत असल्याचे पाहून अप्पा हातनुरे या समाजकंटकाने माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. हातनुरे यांना तत्काळ अटक व्हावी, त्यांची खासगी स्पर्धा क्लासेसची परवानगी रद्द करावी.