शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: कवलापूर विमानतळावरुन जुंपली, शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वादाचे विमानोड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:51 IST

महाविकास आघाडीच्या धावपट्टीवरून निवडणुका जिंकण्यासाठी उड्डाण घेऊ पाहणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या घटक पक्षांत कवलापूर विमानतळाच्या जागेवरून ठिणगी

अविनाश कोळीसांगली : महाविकास आघाडीच्या धावपट्टीवरून निवडणुका जिंकण्यासाठी उड्डाण घेऊ पाहणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या घटक पक्षांत कवलापूर विमानतळाच्या जागेवरून ठिणगी पडली आहे. एकमेकांचे वस्त्रहरण करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातच महाविकास आघाडीच्या बांधणीला धक्का बसला आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुका जिंकण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निश्चय जयंत पाटील यांनी अनेकदा बोलून दाखविला. डोईजड झालेल्या भाजपला शह देण्यासाठी सांगली जिल्ह्यातही त्यांचे आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्याच जिल्ह्यात सुरुंग लावला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी कवलापूर विमानतळाची जागा गुजराती कंपनीला देण्याच्या विषयावरून थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केल्याने जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला शिंगावर घेण्यास सुरुवात केली आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूरच्या जागेवरून शिवसेनेने आता थेट जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जागेच्या वादात कोणाची बाजू योग्य हा विषय संंशोधनाचा असला तरी या विषयाने दोन्ही घटक पक्षांमध्ये वाद पेटविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बांधणीला जबरदस्त धक्का बसू शकतो.शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद नवा नाही. यापूर्वी जयंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यातही अनेकदा खटके उडाले आहेत. जयंत पाटील हे पालकमंत्री असताना अनेक समित्यांमध्ये शिवसेनेला डावलल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावेळी हा वाद मुंबईपर्यंत पोहचला होता. आताही कवलापूर विमानतळावरुन सुरू झालेला वाद महाविकास आघाडीचे विमान खाली उतरविण्यास कारणीभूत ठरू शकतो.

राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येही बिनसलेलेच

महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसशीही राष्ट्रवादीचे बिनसले आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीबाबत योग्यवेळी कठोर निर्णय घेऊ, असा इशारा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीशी सध्या दोन्ही पक्ष चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली