बिळाशी परिसराला पावसाने झाेडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:32+5:302021-05-06T04:29:32+5:30

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) परिसराला सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सलग ...

The area was flooded with rain | बिळाशी परिसराला पावसाने झाेडपले

बिळाशी परिसराला पावसाने झाेडपले

Next

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) परिसराला सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सलग दोन तास झालेल्या पावसात मका पिकाचे व आंबा फळपिकाचे मोठे नुकसान झाले.

बुधवारी दिवसभर शिराळा तालुक्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास शिराळा पश्चिम विभागात अचानक ढग जमा झाले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या दरम्यान अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली तर आंबा पिकाचे माेठे नुकसान झाले. मका पिकाची काढणी शिवारात सुरू असून, अनेकांच्या मक्याचे भिजल्यामुळे नुकसान झाले. या पावसामुळे खरीप पिकाच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. परंतु, सध्या शेतामध्ये पाणी साठून इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: The area was flooded with rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.