शिराळा
: शिराळा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. ही निवड आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
गटनेते विजय दळवी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने या पदावर अर्चना शेटे यांची निवड करण्यात आली आहे. शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. कोरोनाच्या काळामध्ये मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर त्यांनी स्वतः अंत्यसंस्कार केले आहेत. तसेच रुग्णांनाही घरपोच साहित्य देऊन चांगले काम केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामाची सर्वांनी दखल घेतली होती. विविध विकास कामे केली. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
फोटो- ३०अर्चना शेटे