शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेचा गतिमान कारभार, एका सेकंदात वीस विषयांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:21 IST

दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय प्रलंबित

सांगली : गतिमान कारभाराचा दाखला देत महापालिकेच्या महासभेने गुरुवारी एका सेकंदात २० विषयांना मंजुरी दिली. महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चाही न करता केवळ इशाऱ्यावर अख्खे विषयपत्र मंजूर झाले.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची महासभा गुरुवारी पार पडली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदस्यांच्या प्रत्येक विषयावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे विषयपत्रिकेच्या वाचनापूर्वीच तीन तास पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. यातून काहीही निर्णय झाला नाही. सकाळी साडेअकराला सभा सुरू झाली होती. मात्र, विषयपत्रिकेवरील विषय वाचनास अडीच वाजता सुरुवात झाली. दुखवट्याचे व अभिनंदनाचे ठराव वाचन झाल्यानंतर विषयपत्रिकेवरील मुख्य विषय चर्चेत येणार होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सभा तहकूब करून सोमवारी पुन्हा घेण्याची मागणी केली. काही सदस्यांनी तहकूब करण्यापेक्षा विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्याचे सुचविले. भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा एक विषय प्रलंबित ठेवून अन्य विषयांच्या मंजुरीस नाहरकत दिली. त्यामुळे केवळ एका सेकंदात सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा संपविण्यात आली. मिरजेतील ३०३.९० चौरस मीटरच्या भूखंडाची अदलाबदल करण्यासही मंजुरी देण्यात आली.

या विषयांना मिळाली मंजुरी

  • सांगलीतील सर्किट हाऊस रोड ते बायपास रस्त्याचे ‘सद्गुरू वामनराव पै’ नामकरण
  • प्रभाग क्र. १७ मधील शंभर फुटीपर्यंतच्या एका रस्त्यास निसर्गप्रेमी शिवाजीराव ओऊळकर यांचे नाव.
  • जातिवाचक रस्ते, वस्त्यांची नावे बदलणार
  • रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी शिवाजी स्टेडियमची पूर्वेकडील भिंत, जुनी पॅव्हेलियन इमारत पाडण्यास मान्यता.
  • हिराबाग वॉटर वर्क्स येथील जुन्या शाळेची इमारत पाडून सांस्कृतिक हॉल होणार.
  • सेवेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देणार.
  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २८८ सदनिकांचा मंजूर प्रकल्प जागेअभावी रद्दचा प्रस्ताव शासनाला पाठवणार.

दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय प्रलंबितज्या ग्राहकांचे पाण्याचे मीटर बंद आहेत, त्यांना जोपर्यंत नवीन सुस्थितीत मीटर बसत नाही, तोपर्यंत पूर्वीच्या तुलनेत दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगली