शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, शासनाचा पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न 

By संतोष भिसे | Updated: December 19, 2022 17:53 IST

राज्यभरात ३५ हजार जागा रिक्त, शाळा बंद करण्याला तीव्र विरोध झाल्याने पर्यायी मार्ग काढण्याचा शासनाचा प्रयत्न

सांगली : वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत निवृत्त शिक्षकांना नेमण्याचा विचार शासन करत आहे. या शाळा बंद करण्याला तीव्र विरोध झाल्याने पर्यायी मार्ग काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरु होत्या, मात्र शिक्षक संघटना व पालकांनी त्याला कडाडून विरोध केला. कोकणासह डोंगराळ व दुर्गम भागात कमी पटसंख्येच्या शाळा मोठ्या संख्येने आहेत. त्या बंद केल्यास विद्यार्थ्यांना लांब अंतरावरील शाळेत चालत जावे लागेल, परिणामी ते शिक्षण सोडून देतील अशी भिती आहे. यातून शिक्षणाचा हक्क कायद्याचे उल्लंघन होईल. यावर मार्ग काढताना शासनाने परिवहन संकल्पनेचाही विचार केला. त्यानुसार विद्यार्थ्यांची जवळच्या शाळेत खासगी वाहनातून ने-आण करण्याचे नियोजन होते. मात्र हा उपायदेखील अव्यवहार्य ठरला. आता शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार शिक्षण विभाग करत आहे. शाळा सुरुच ठेवायच्या, पण खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी किंवा निवृत्त शिक्षक नेमायचे असे नियोजन सुरु आहे.निवृत्त शिक्षकांकडून मानधन तत्वावर काम करुन घेतले जाईल. शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्याने त्यांना वेगळे प्रशिक्षण किंवा अध्यापनाची कार्यशैली सांगावी लागणार नाही. त्याचबरोबर पात्रताधारक तरुणांनाही कंत्राटी स्वरुपात घेण्याच्या हालचाली आहेत. त्यांचे मानधन ग्रामपंचायती वित्त आयोगातून देतील. या प्रक्रियेची जबाबदारी पुण्यातील क्षितिज संस्थेवर सोपविण्यात आली आहे. १ जानेवारीपासून नियुक्ती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

राज्यभरात ३५ हजार जागा रिक्तराज्यभरात प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे ३५ हजार जागा रिक्त आहेत. सांगली जिल्ह्यात ही संख्या सुमारे ९०० आहे. रिक्त जागा भरल्यास निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीची किंवा कंत्राटी नियुक्त्यांची वेळ येणार नाही असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी पदांवर शिक्षकांना पदोन्नत्या देण्यात आल्या, पण रिक्त झालेल्या जागांवर नव्याने भरती केलेली नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होत असल्याचा संघटनांचा दावा आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाGovernmentसरकार