शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:55 IST

Highway Sangli : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनकामी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार वर्षांपासून विचाराधीन असणारा विषय यामुळे मार्गी लागला आहे. लवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्तीलवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा

संतोष भिसेसांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनकामी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार वर्षांपासून विचाराधीन असणारा विषय यामुळे मार्गी लागला आहे. लवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.लवाद नियुक्तीसाठी शेतकरी पाठपुरावा करत होते. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लवाद म्हणून नियुक्तीचे केंद्र सरकारचे नियोजन होते, पण सध्या सांगलीत हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. रत्नागिरी - नागपूर महामार्ग क्रमांक १६६ च्या भूसंपादनविषयी सांगली जिल्ह्याच्या सीमेत लवाद म्हणून निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

जिल्ह्यात मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतील २६ गावांतून महामार्ग जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ३०५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सोलापूर या चार जिल्ह्यांत भूसंपादनापोटी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. एकट्या सांगली जिल्ह्यात ९७१ कोटींहून अधिक भरपाई दिली जात आहे.

रेडी रेकनरपेक्षा पाचपटींपर्यंत भरपाई मिळत आहे. शिवाय घरे, झाडे, बागायती, विहीर, कूपनलिका आदींसाठीही भरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना मुल्यांकन मान्य नाही. त्यांनी महामार्गाच्या कामासाठी जमिनी दिल्या असल्या तरी भरपाईचे पैसे स्वीकारलेले नाहीत. काहींनी पैसे स्वीकारले तरी कायदेशीर दाद मागण्याचा हक्क राखून ठेवला आहे.या शेतकऱ्यांना आता लवादापुढे दाद मागता येईल. गेली तीन-चार वर्षे लवाद अस्तित्वात नसल्याने दाद मागता आलेली नव्हती. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजू मांडता येईल. जमिनींचे मुल्यांकन चुकीचे केल्याची सर्वांची मुख्य तक्रार आहे. 

केंद्र सरकारने लवादाची नियुक्ती केल्याने शेतकऱ्यांना आता दाद मागता येईल. महामार्ग भूसंपादनावेळी कमी मुल्यांकनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना न्याय मिळेल. लवाद नियुक्तीसाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्याला यश आले आहे. शासनाने लवादाची प्रत्यक्ष कार्यवाही तातडीने सुरु करावी.- महेश सलगरे,महामार्गबाधित शेतकऱ्यांची कृती समिती.

टॅग्स :highwayमहामार्गSangliसांगलीkonkanकोकण