शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यात ५८ उमेदवारांचे अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:44 IST

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मोठ्या चुरशीने ५८ उमेदवारांनी ७५ अर्ज दाखल केले. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ...

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मोठ्या चुरशीने ५८ उमेदवारांनी ७५ अर्ज दाखल केले. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मंगळवारी (दि. २९ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी काेण बंडखोर अर्ज दाखल करणार, याविषयी उत्सुकता आहे.सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत वसुबारसच्या मुहूर्तावर काही अपवाद वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पलूस-कडेगावमधून काँग्रेसकडून डॉ. विश्वजीत कदम, सांगलीतून जयश्रीताई पाटील, मिरजमधून उद्धवसेनेतून तानाजी सातपुते, कॉंग्रेसचे मोहन वनखंडे आणि त्यांचा मुलगा सागर वनखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरमधून माजी आमदार सदाशिवराव पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील, तासगाव-कवठेमहांकाळमधून आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील, जतमधून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, शिराळ्यातून सत्यजीत देशमुख आदी प्रमुख उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले.

बंडखोरांच्या अर्जाची उत्सुकता..खानापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगली भाजपतील पप्पू डोंगरे व तम्मनगौडा रवी-पाटील हे आज मंगळवारी बंडखोरी करत अर्ज भरणार का याची उत्सुकता आहे. तसेच, सांगलीतून कॉंग्रेसचे पृथ्वीराज पाटील, शिराळ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

इच्छुकांचे ७५ अर्ज दाखलविधानसभा मतदारसंघनिहाय - अर्ज संख्या

  • मिरज - १४
  • सांगली - १०
  • इस्लामपूर - ०२
  • शिराळा  - १०
  • खानापूर - १०
  • जत - ७
  • पलूस-कडेगाव - १०
  • तासगाव-कवठेमहांकाळ - १२
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024