शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अंनिसचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांना कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 6:17 PM

ANNIS activist Sangli- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते राहिलेले स्मृतीशेष विजय काका कराडे यांचे व्दितीय स्मृती दिनानिमित्त अंनिस तासगांव व कराडे परिवाराच्या वतीने दिला जाणारा दुसरा 'विजय काका कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार' अंनिसचे कार्यकर्ते इंजि. फारूक गवंडी यांना जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती सौ.वसुधा कराडे - शेटे यांनी दिली.

ठळक मुद्देअंनिसचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांना कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार जाहीर पंधरा हजार रोख व मानपत्र : रविवारी प्रा. प.रा.आर्डे यांचे हस्ते वितरण

सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते राहिलेले स्मृतीशेष विजय काका कराडे यांचे व्दितीय स्मृती दिनानिमित्त अंनिस तासगांव व कराडे परिवाराच्या वतीने दिला जाणारा दुसरा 'विजय काका कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार' अंनिसचे कार्यकर्ते इंजि. फारूक गवंडी यांना जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती सौ.वसुधा कराडे - शेटे यांनी दिली.

विजय कराडे यांचे स्मृती जपण्यासाठी व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळणेसाठी या पुरस्काराचा उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी हा पुरस्कार अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात व भास्कर सदाकळे यांना दिला गेला होता.या स्मृती पुरस्काराचे स्वरूप रू. पंधरा हजार रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे, पुरस्काराचे वितरण अंनिस वार्तापत्राचे सल्लागार संपादक प्रा.प.रा.आर्डे यांचे हस्ते तर सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवारती डॉ.विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम तासगांव येथे रविवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. होईल.पुरस्कार्थी फारूक गवंडी हे १९९२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असून ते महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून नोकरी करतात.त्यांनी स्वकष्टाने अत्यंत गरीब परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी कॉलेज जीवनापासूनच विजय कराडे यांचे मार्गदर्शनाखाली अंनिसच्या कामाची सुरुवात तासगांवातून केली होती.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामासोबतच फारूक गवंडी यांनी मुस्लिम सामाजिक प्रश्नांबाबत मुस्लीम अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संघर्ष केला आहे, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत पाणी चळवळीचे काम तसेच कॉ.गोविंद पानसरे यांच्या सोबत समाजातील शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच उअअ आणि ठफउ कायद्याच्या विरोधातील आंदोलनात त्यांनी व्याख्यानातून केलेले प्रबोधन,काढलेले मोर्चे या गवंडी यांच्या कामाची नोंद समाजाने ठळकपणे घेतली आहे.मुस्लिमांच्या बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी "मुस्लिमांच्या बद्दलचे भ्रम आणि वास्तव" या दोन भागातील व्हिडिओ संवादाची फारूक गवंडी यांनी निर्मिती केली आहे. ही निर्मिती परिवर्तनाच्या चळवळीत एक मैलाचा दगड ठरेल इतकी महत्त्वाची आहे.या कार्यक्रमास कोरोना बाबत संपूर्ण खबरदारी घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन अंनिस तासगांव व कराडे परिवार यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन राहुल थोरात,अतुल वाघ,बाबुराव जाधव, प्रा.वासुदेव गुरव, अमर खोत, अमित कराडे, पांडुरंग जाधव, अशोक पाटील करीत आहेत

टॅग्स :Sangliसांगली