शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

जन्मशताब्दीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे दर्जेदार स्मारक : सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:11 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे दिली.

सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे दिली.  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नियोजन व पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगिता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, वाटेगावचे सरपंच सुरेश साठे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सुरेश खाडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने वाटेगाव मधील मागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, यापूर्वी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी 28 ठिकाणे, स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवलापूर आणि वाटेगावचा समावेश आहे. वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी यापूर्वीच जवळपास 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.अण्णाभाऊ साठे राहत असलेल्या मुंबईतील निवासस्थानीही त्यांचे भव्य स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जन्म असल्याने अण्णाभाऊ साठे यांचे जिल्ह्यात एक दर्जेदार स्मारक उभा करण्यासाठी जागा निश्चिती करून, प्रस्ताव सादर करावा. या स्मारकाच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी अभ्यासिका आदिंचा समावेश असावा. याचबरोबरच संस्था, संघटना आदिंकडून येणाऱ्या सूचनांचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी दि. 1 ऑगस्ट रोजी त्यांचे जन्मस्थळ वाटेगाव आणि मिरज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगिता खोत यांनी मौलिक सूचना केल्या. स्वागत अविनाश देवसटवार यांनी केले. तर आभार सचिन कवले यांनी मानले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली