करगणीत अनिल पिंजारी याचा जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST2021-02-21T04:48:38+5:302021-02-21T04:48:38+5:30

करगणी : करगणी (ता. आटपडी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ठरावासाठी अनिल बाबर विकास सोसायटीमध्ये अत्यंत चुरशीने राष्ट्रवादीचे उमेश पाटील व ...

Anil Pinjari's resolution for District Bank voting in Kargani | करगणीत अनिल पिंजारी याचा जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव

करगणीत अनिल पिंजारी याचा जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव

करगणी : करगणी (ता. आटपडी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ठरावासाठी अनिल बाबर विकास सोसायटीमध्ये अत्यंत चुरशीने राष्ट्रवादीचे उमेश पाटील व भाजपच्या गटाचे अनिल पिंजारी यांच्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अनिलराव बाबर विकास सोसायटीमध्ये जिल्ह्या बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव घेण्याकामी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेने अनेक राजकीय डावपेच आखत शिवसेनेच्या गटातील सदस्याच्या ठरावासाठी प्रयत्न केले होते. मात्र करगणीतील उमेश पाटील युवा शक्तीने शिवसेनेच्या राजकीय डावपेचावर कुरघोडी करत भाजपा व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वसमावेशक अनिल पिंजारी याचा ठराव घेण्यास भाग पाडले.

यावेळी अशोक पिंजारी, पिंटू सरगर, सुनील पुकळे, भगवान सरगर, भारत पाटील, मुद्दसर इनामदार, उत्तम माने, महेश पाटील, भारत पाटील, विष्णू खिलारी, सचिन कोळेकर, श्रीधर खिलारी, मनोहर माने, समाधान करांडे, इजाज इनामदार, दुर्वा पाटील, बाळासाहेब करांडे, रघुनाथ चोथे, सत्यवान पिंजारी, प्रकाश गायकवाड, दाजी खिलारी यांनी थरावासाठी प्रयत्न केले.

चौकत

सर्वपक्षीय बैठक

गावात शिवसेना सोडून सर्वपक्षीय संयुक्त बैठकीमध्ये करगणी ग्रामपंचायतमध्ये लवकरच सत्तातर करण्याचा निर्धार करण्यात आला. यामुळे आगामी काळात गावातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Anil Pinjari's resolution for District Bank voting in Kargani