शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

अनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:27 IST

आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चासोशल मीडियावर व्हायरल

अविनाश बाडआटपाडी : आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. या भाषणाच्या चित्रफितीचे सध्या मतदारसंघात बाबर गटाचे कार्यकर्ते चांगलेच मार्केटिंग करीत आहेत; तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रफितीनंतर, एवढ्या चांगल्या नेत्याला तुम्ही सत्तेत असताना का मंत्री केले नाही, अशीही विचारणा केली जात आहे. आ. पाटील यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचे बोलले जात आहे.विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना आमदार पाटील यांनी आमदार बाबर यांची चांगलीच स्तुती केली. ते म्हणाले, बाबर यांच्यासारखा उत्तम प्रशासक, चिकाटीचा कार्यकर्ता तुमच्या पक्षाला मिळाला आहे. तुमचे सगळे आमदार एका बाजूला उभे करा आणि आमच्या बाबर यांना एका बाजूला उभे करा. चिकाटीचा आणि वसंतदादांच्या तालमीत शिकलेला नेता तुम्ही मंत्रिमंडळात घ्यायला हवा होता.आ. पाटील यांच्या या भूमिकेचे राजकीय जाणकार वेगवेगळे अर्थ काढत आहेत. केवळ ३५ सेकंदाच्या या चित्रफितीने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकारणातील अनेक नेत्यांचे व्यक्तिगत संबंध असतात; पण थेट विधानसभेत आ. पाटील यांनी सत्तारूढ पक्षातील आमदार बाबर यांची बाजू घेतली. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथील कोणत्याच लोकप्रतिनिधीला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. मात्र येथील नेत्यांनी स्वकर्तृत्वावर या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.आ. पाटील यांच्या या भाषणामुळे बाबरप्रेमी खुशीत दिसत आहेत. मात्र त्याचवेळी जेव्हा राष्ट्रवादी -कॉँग्रेसची सत्ता होती, तेव्हा बाबर यांना मंत्रिपदाची संधी देण्यापासून कुणी रोखले होते, की त्यांचे कर्तृत्व आणि महत्त्व ते शिवसेनेत गेल्यावर कळाले? आमदार बाबर टेंभू योजनेच्या पाण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. पण आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात केवळ भाषणबाजीशिवाय व अनुशेषाचे कारण दाखवण्याशिवाय ठोस काय झाले, की केवळ शिवसेनेत असंतोष पसरावा, यासाठी बाबर कर्तृत्ववान असल्याचा साक्षात्कार आमदार पाटील यांना झाला, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Baburअनिल बाबरSangliसांगली