शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळेचा खून कट रचूनच! : जिल्हा न्यायालयास सादर; नोव्हेंबरमध्ये पुढील सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:40 IST

अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले.

ठळक मुद्देआरोप प्रस्तावित -सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे यांना लूटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती.

कोठडीत मारले आंबोलीत जाळले

सांगली : अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले. या खटल्याची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे यांना लूटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाल्याने, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. कामटेसह बडतर्फ पोलीस हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली होती.

या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. मंगळवारी अ‍ॅड. निकम यांनी कामटेसह सात संशयितांविरुद्ध दहा आरोप प्रस्तावित केले. कामटेसह सातही संशयितांनी अनिकेतच्या खुनाचा कट रचला. लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेतसह त्याचा मित्र भंडारेला अटक केली. अन्य गुन्हे कबूल करुन घेण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे गरजेचे होते.

पण प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी संशयितांनी त्याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड येथे नेऊन जाळला. यामध्ये शिक्षा होऊ शकते, हे माहीत असतानाही त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हेही कृत्य सर्वांनी संगनमताने केले. अनिकेतचा खून केला असताना, तो पळून गेल्याचा बनाव रचला. तशी खोटी फिर्याद देऊन अधिकाºयांची दिशाभूल करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला. भंडारेलाही बेदम मारहाण केली. त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला, असे दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. यावरील पुढील सुनावणी नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.मुख्य पुरावाही नष्टसांगली शहर पोलीस ठाण्यात व आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अनिकेतचा मृतदेह बाहेर नेताना हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. हा महत्त्वाचा पुरावा होता. पण कामटे, लाड व टोणे या तिघांनी संगनमत करुन सीसीटीव्हीचा डीव्हीआर नष्ट केला. हे कृत्यही त्यांनी संगनमताने केले, या आरोपाचाही समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली