शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात अनिकेत कोथळेला तोंड बुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनिकेतचे तोंड पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात बुडवल्यानंतर तो तडफडत होता. त्यानंतर तो निपचित पडला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनिकेतचे तोंड पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात बुडवल्यानंतर तो तडफडत होता. त्यानंतर तो निपचित पडला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने माझ्या डोक्याला रिव्हॉल्वर लावत हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली, अशी साक्ष अनिकेत कोथळे खून खटल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याने सोमवारी न्यायालयात दिली.

अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलीस कोठडीतील मारहाणीनंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला होता. कोरोनामुळे स्थगित असलेल्या या खटल्याची सुनावणी सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत.

सोमवारी अनिकेतचा मित्र व घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष झाली.

अमोल भंडारेने सांगितले की, घटनेच्या रात्री आठच्या सुमारास आम्हा दोघांना लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले. तेथे पोलीस कर्मचारी अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झाकीर पट्टेवाले होते. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने खोलीचा दरवाजा बंद करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अनिकेतचे हातपाय दोरीने बांधण्यात आले होते. कामटेने त्याला उलटे टांगायला सांगितले. छताला उलटे टांगल्यानंतर त्याला बुरखा घालण्यात आला. नंतर पाण्याच्या बादलीत त्याचे तोंड बुडवले. कामटेच्या सांगण्याप्रमाणे टोणे, लाड, पट्टेवाले दोरी हळूहळू खाली सोडत होते. डोके पाण्यात बुडल्यानंतर अनिकेत तडफडत होता. ‘श्‍वास गुदमरतोय, बुरखा काढा’, असे तो ओरडत होता. त्यानंतर तो निपचित पडला. त्यावेळी मला त्याच्या पाठीवर बसण्यास सांगत त्याच्या तोंडात फुंकर मारण्यास सांगितले. मात्र उपयोग झाला नाही. नंतर मुल्ला मला गणेश विसर्जन घाटावर घेऊन गेला. तेथे एक पोलीस गाडी आणि मोटार आली. मला मोटारीच्या डिकीत बसण्यास सांगण्यात आले. यावेळी अनिकेतचा मृतदेह पोलीस गाडीतून मोटारीत ठेवण्यात आल्याचे दिसले. साडेतीन तासांनंतर मोटार थांबली. त्यावेळी मला मृतदेह जळाल्याचा वास आला. त्यानंतर कामटे, लाड, टोणे मोटारीत येऊन बसले. ‘हा प्रकार कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुलाही असेच मारून टाकू’, अशी धमकी कामटे आणि टोणेने दिली.

आता मंगळवारी अमोलची उलटतपासणी होणार आहे.

चौकट

गोळ्या घालून ठार मारू

लाड, टोणे व कामटे मोटारीत येऊन बसल्यानंतर कामटेने माझ्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावत, ‘मी आणि अनिकेत दोघेजण पळून गेलो होतो, मी निपाणीला गेलो तर अनिकेत कोठे गेला याची मला माहिती नाही, असे सांग, नाहीतर तुलाही गोळ्या घालून ठार मारू’, असे धमकी कामटेने दिल्याचे भंडारे याने न्यायालयासमोर सांगितले.