शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे खून प्रकरण: मारहाणीत किडनी, हृदयाला झालेल्या जखमामुळेच मृत्यू, डॉक्टरांची महत्त्वपूर्ण साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:28 IST

अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली

सांगली : अनिकेत कोथळे याच्या फुप्फुस आणि किडनीसह इतर अवयवांना जखमा झाल्या होत्या. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची महत्त्वपूर्ण साक्ष डॉ. वैभव सोनार यांनी बुधवारी न्यायालयासमोर दिली. प्लास्टिकच्या काठीने मारल्यानेही मृत्यूची शक्यता असते, असेही डॉ. सोनार यांनी सांगितले.सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतील मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. या खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. मारहाणीतील मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न संशयितांनी केला होता. या अर्धवट जळालेल्या त्याच्या अवयवाचे विच्छेदन डॉ. वैभव सोनार यांनी केले होते. त्यामुळे त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेत डॉ. सोनार यांच्याकडून अनिकेतच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले. यापूर्वी नोंदविलेली त्यांची साक्ष कायम ठेवत अवयवांवर झालेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरतपास झाल्यानंतर बचाव पक्षातर्फे ॲड. प्रमोद सुतार, ॲड. विकास पाटील आणि ॲड. गिरीष तपकिरे यांनी डॉ. सोनार यांना प्रश्न विचारले. सोनार यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नावर ॲड. निकम यांनी आक्षेप घेतल्याने दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

१९ मेपासून पुढील सुनावणीअनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून, आता पुढील सुनावणी १९ आणि २० मे रोजी होणार आहे. त्यावेळी या प्रकरणाचे प्रमुख तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची साक्ष होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणCourtन्यायालयdoctorडॉक्टर