शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांद्वारे वैद्यकीय व्यवसायास चालना दिल्याबद्दल महापालिकेचे आभार, मिरजेत अभिनव आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:25 IST

शहर सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली अमाप पैसा खर्च होत आहे. परंतु रस्त्यांची मोठी दुरावस्था.

मिरज: सांगली जिल्ह्यात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खराब रस्त्यामुळे अपघात होवून अनेकजण आयुष्यभरासाठी अदू झाले आहेत. यासर्व घटनेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. संतप्त नागरिकांनी याबाबत महापालिकेविरोधात लोक अभियानाच्यावतीने अभिनव आंदोलन करत शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो काढून महानगरपालिकेच्या आवारात त्याचे प्रदर्शन भरवले.मिरज शहरात मार्केट परिसर, गाढवे चौक, पोलीस स्टेशन, सराफ कट्टा, मंगळवार पेठ किल्ला भाग, ब्राह्मणपुरी, वखारभाग, नदीवेस, पाटील गल्ली, सोमवार पेठ, कमान वेस, वाळवे गल्ली, विजापूर वेस, दिंडी वेस येथील फोटो काढून महानगरपालिकेच्या आवारात गेटवर, दरवाजावर, हे फोटो चिटकवण्यात आले आहेत.मिरजेतील खड्ड्यांच्या प्रदर्शनात सहर्ष स्वागत. खड्ड्यांद्वारे वैद्यकीय व्यवसाय चालना दिल्याबद्दल महापालिकेचे आभार. महापालिकेच्या खड्ड्यांची लवकरच विश्वविक्रमासाठी नोंद असे आशयाचे मजकूर लिहिले होते. लोक अभियनाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात हे फोटो चिटकवण्यासाठी प्रवेश केला असता प्रशासनाने दरवाजे बंद केले. प्रशासनाने आडवणुक केली असता कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला.लोक अभियानच्यावतीने तीन महिन्यापूर्वी स्वखर्चाने शहरातील खड्डे भरून घेतले होते. शहर सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली अमाप पैसा खर्च होत आहे. परंतु रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त न केल्यास अधिकारी नगरसेवकांच्या गाडी अडवून त्यांना खड्ड्यात बसवून फोटो काढले जातील असा इशारा लोक अभियानाचे निमंत्रक ओमकार शुक्ल यांनी दिला. यावेळी लोक अभियानाचे निमंत्रण सी.जी कुलकर्णी, निलेश साठे, विजय राठी, अनिल हंबर, सुरज डवरी, महेश नाईक, अभिषेक म्हेत्रे उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक