शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी केली गद्दारी, सांगलीकर शरद पवारांच्याच दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:25 IST

प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोक शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांनी ज्यापद्धतीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते याबाबत प्रचंड नाराज आहेत.

ठळक मुद्देआम्ही कधीच शरद पवारांच्या भूमिकेशी प्रतारणा करू शकत नाही. अजित पवारांच्या भूमिकेने राज्यातील राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

सांगली : राज्यातील अनाकलनीय सत्तानाट्याने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली असून अशा परिस्थितीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ठाम असल्याचे मत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे अजित पवारांच्या कृत्याबद्दल काहींनी संतापही व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारत क्रमांक एकचा पक्ष म्हणून यश मिळविले. त्यामुळे येथील राष्ट्रवादी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांनी राज्यातील सत्तानाट्यात बंडाची भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते हादरुन गेले, मात्र या घडामोडीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पर्यायाने शरद पवारांशी आपण बांधिल असल्याची भूमिका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत राष्ट्रवादी एकसंध असल्याचे दिसून आले. दुसरीकडे अजित पवारांच्या भूमिकेविषयी जिल्ह्यातून नाराजीचा सूर उमटत आहेत. त्यांच्या कृतीला गद्दारी म्हणूनही संबोधले आहे.

प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोक शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांनी ज्यापद्धतीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते याबाबत प्रचंड नाराज आहेत. आम्ही कधीच शरद पवारांच्या भूमिकेशी प्रतारणा करू शकत नाही. अजित पवारांच्या भूमिकेने राज्यातील राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

आमदारही शरद पवारांसोबतजिल्ह्यातील तिन्ही आमदार शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी जयंत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले. आ. सुमनताई पाटील यांनीही शरद पवारांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्या शनिवारी सायंकाळी मुंबईतील बैठकीला उपस्थित होत्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही शरद पवारांसोबतच असल्याने जिल्ह्यातील आमदार एकसंधपणे शरद पवारांशी बांधिल असल्याचे दिसत आहेत.राष्ट्रवादी कार्यकर्ते हादरलेराज्यात राष्ट्रवादीच्या यशाचा आनंद अजूनही साजरा होत असतानाच अजित पवारांच्या बंडाळीने पक्षाचे कार्यकर्ते हादरुन गेले. सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी बजावणार असल्याने गेल्या दोन दिवसांपासून येथील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाची तयारी केली होती. अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे व अजित पवारांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला. तरीही या परिस्थितीत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय येथील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलsumantai patilसुमनताई पाटील